घनसावंगी-दोन दुचाकीचा भीषण अपघात ! समोर समोर झाली धडक

 तिघेजण गंभीर जखमी, जालन्यात हलवले उपचारासाठी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      २२ एप्रिल मंगळवार रोजी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते गोंदी रस्त्यावर दोन मोटारसायकलस्वारांचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

    MH-21-BE-2310 व MH-44-AF-1005 या दोन दुचाकीचा अपघात झाला या अपघातात आबासाहेब सखाराम कुंडकर (वय 50, रा. माजलगाव) हे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असून पायाला फ्रॅक्चर आहे. ते जोग्लादेवी येथून लग्न लावून तीर्थपुरीकडे जात होते. त्यांच्यासोबत असलेल्या सरस्वती आबासाहेब कुंडकर यांच्याही बोटांना गंभीर इजा झाली असून बोटे तुटली आहेत.

     दुसऱ्या दुचाकीवरील संतोष रायभान पाटेकर (वय 40, रा. रामसगाव) हे देखील अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. ते तीर्थपुरीहून रामसगावकडे जात होते.

   सर्व जखमींना तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाकडे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. अपघाताची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!