घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

अंबड - घनसावंगी तालुक्यात टँकरमुक्तीसाठी महत्त्वाचा टप्पा: जलसंधारण कार्याला गती; १५.२०लाखांचा एकूण लोकसहभातून होताहेत कामे

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   अंबड - घनसावंगी तालुक्याला कायमस्वरूपी पाणीदार करून टँकरमुक्त करण्याचा संकल्प समस्त महाजन ट्रस्ट, मुंबईच्या नूतन दीदींनी हाती घेतला असून, या सामाजिक उपक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

  ग्रामीण भागातील सामान्य जनतेला स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे व शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा आधार मिळावा, यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन जलसंधारणाविषयी जागृती करण्यात आली.यासाठी आत्तापर्यंत लोकसहभाग डिझेल खर्च व ट्रस्टचा मशीन खर्च मिळून जवळपास पंधरा लाख वीस हजार रुपये लोकसहभाग कामे होत आहेत. अशी माहिती समाज सेवक देवानंद चित्राल यांनी दिली.


     या उपक्रमांतर्गत ट्रस्टच्या मोफत पोकलेन्ड मशिनद्वारे नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण, तसेच तळ्यातील गाळ मोफत स्वरूपात शेतकऱ्यांच्या वाहनांमध्ये भरून देण्यात आला. गाळ वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. दि. १६ एप्रिल पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून, गाव पातळीवर जल समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला असून, डिझेल खर्चाचा ५०% हिस्सा ग्रामस्थांनी उचलला आहे, तर उर्वरित खर्च संस्थेमार्फत करण्यात येत आहे.


    घनसावंगी तालुक्यातील रांजणी – ८०० मीटर काम, अवलगाव – ५०० मीटर काम, पाणेवाडी – ६०० मीटर काम, काकडे कंडारी – ४०० मीटर काम, शेवगळ – ३०० मीटर काम हाती घेण्यात आले आहे तर अंबड तालुक्यातील खडकेश्वर – ८०० मीटर काम व कोठाळा – ३००मीटर काम याचा समावेश आहे. यासाठी आत्तापर्यंत लोकसहभाग डिझेल खर्च व ट्रस्टचा मशीन खर्च मिळून जवळपास पंधरा लाख वीस हजार रुपये लोकसहभागातून कामे होत आहेत.

    शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता, जर व्यापक लोकसहभाग मिळाला तर एका दिवसात २५ पोकलेन्ड मशिनद्वारे संपूर्ण तालुक्याचे काम एका महिन्यात पूर्ण होऊ शकते, असे ठामपणे सांगण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ पाणीदार भविष्य घडवण्याचा नाही, तर ग्रामीण जनतेला स्वावलंबी करण्याच्या दिशेने उचललेले एक प्रेरणादायी पाऊल आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या