अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत आज २२ एप्रिल रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार योगिता खटावकर यांच्या उपस्थितीत पार पडली असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण दिलेले आहे. काही ठिकाणी चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित ग्रामपंचायती

   राहेरा, कोठी, रवना, देवडी हादगाव, लिंबी, निपाणी पिंपळगाव, पानेवाडी (महिला), मरमा खुर्द (महिला), सिध्देश्वर पिंपळगाव (महिला), पिंपरखेड बु. (महिला), पाडुळी बु. (महिला), चित्रवडगाव (महिला), दहिगव्हाण बु. (महिला)

अनुसूचित जमातीसाठी आरक्षण

अंतरवाली राठी, मुद्रेगाव (महिला - चिठ्ठीद्वारे)

नवबौद्ध व मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.)

या प्रवर्गातील आरक्षण चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले असून खालील ग्रामपंचायतींमध्ये लागू होईल:

शिवनगाव, डहाळेगाव, करडगाव वाडी, बोररांजणी, कुंभार पिंपळगाव, दैठणा खुर्द, बोरगाव खु., मुढेगाव, पारडगाव, यावलपिंप्री, अरगडे गव्हाण, नागोबाची वाडी, हातडी

महिला: मानेपुरी, आवलगाव बु., सरफगव्हाण, करडगाव, पिरगैबवाडी, गुंज बु., बोडखा बु., साकळगाव, यावलपिंप्री तांडा, भंडाळा, बाँधलापुरी, गाढेसावरगाव, गुरुपिंपरी


सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती

   खापरदेव हिवरा, खालापुरी, घानेगाव, घोन्सो खु., चापडगाव, जिरडगाव, तळेगाव, देवीदहेगाव, दैठणा बु., बोलेगाव, भायगव्हाण, भूतेगाव, भोगगाव, मंगरुळ, मांदळा, मासेगाव, राजाटाकळी, राजेगाव, राणीउंचेगाव, मोहपुरी, शिंदेवडगाव, शेवगळ, शेवता, श्रीपतधामनगाव, सिंदखेड, बानेगाव


सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती

    अंतरवाली टेंभी, अंतरवाली दाई, उक्कडगाव, कंडारी अंबड, कंडारी परतूर, कोठाळा बु., खडका, घोन्सी बु., जांबसमर्थ, जोगलादेवी, ढाकेफळ, पांगरा, बहिरेगाव, भादलो, म. चिचोली, मंगुजळगाव, माहेरजवळा, येवला, रांजणी, वडीरामसगाव, विरेगव्हाण तांडा, देवहिवरा, बाचेगाव, मूर्ती, रामसगाव, लिंबोणी (चिठ्ठीद्वारे), खडकावाडी (चिठ्ठांद्वारे), रांजणीवाडी (चिठ्ठीद्वारे)

    या आरक्षण यादीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांनी या यादीचा अभ्यास करून पुढील रणनीती ठरवावी लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या