घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

शेतीपिक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य:शासनाने जारी केले परिपत्रक

अॅग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरणाची प्रक्रिया १५ जुलैपासून लागू


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक नुकसानीच्या मदतीसाठी आता कृषी विभागाच्या ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेत नोंदणी करून मिळालेला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ एप्रिल २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे.


१५ जुलै २०२५ पासून नवीन नियम अंमलात येणार

    या नव्या प्रक्रियेनुसार, १५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून शेतीपिक व शेतजमिन नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा 'फार्मर आयडी' असणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्रिस्टॅक योजनेत आपली नोंदणी करून आपला आयडी मिळवणे आवश्यक ठरणार आहे.


पंचनाम्यात ‘फार्मर आयडी’साठी स्वतंत्र रकाना

    शेतीपिक नुकसान पंचनामे करताना आता शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी (फार्मर आयडी) स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार आहे. पंचनामे पारंपरिक पद्धतीने केले जात असले तरी, या नव्या रकान्यात संबंधित शेतकऱ्याचा आयडी क्रमांक भरावा लागेल.


डीबीटी प्रणालीतही ‘फार्मर आयडी’ आवश्यक

    शेतीपिक नुकसानभरपाई थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीत देताना देखील शेतकऱ्याचा ‘फार्मर आयडी’ क्रमांक अनिवार्य असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या शेतकरी ओळख क्रमांकाचा अचूक वापर करावा लागणार आहे.


ई-पंचनाम्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

    राज्यभर टप्प्याटप्प्याने ई-पंचनामे सुरू करताना देखील शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य राहणार आहे. यामुळे नोंदणी व मदत वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व अचूकता येईल, अशी अपेक्षा आहे.


अॅग्रिस्टॅक योजनेचा उद्देश

   राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अंमलात आणण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची अचूक माहिती एकत्र करणे, विविध योजनांचा लाभ थेट व लवकर पोहोचवणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत वितरणाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.


 शासनाचार हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून सह सचिव कैलास गायकवाड जारी केला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या