घनसावंगी- पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू; दुसऱ्या दिवशी सापडले प्रेत

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जायकवाडी पैठण डाव्या कालव्याच्या गेट क्रमांक ९१ सीआरजवळ दि २६ एप्रिल शनिवारी सकाळी मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेले शकील मजीद कुरेशी (वय ४०) पाण्यात उडी मारल्यानंतर बेपत्ता झाले होते. रविवारी दि २७ एप्रिल रोजी सकाळी हादगाव शिवारात कालव्यात त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शकील कुरेशी आपल्या दहा वर्षाच्या मुलाला पोहायला शिकवण्यासाठी कालव्याजवळ गेले होते. त्यांनी मुलाला काठावर बसवले आणि स्वतः गेटजवळ उडी मारली. मात्र गेटजवळ पाणी खवळलेले असल्याने त्यांना वर येता आले नाही आणि ते पाण्यात बुडून बेपत्ता झाले.

     घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच कुंभार पिंपळगाव ते हादगाव, आष्टी, लोणीपर्यंत अनेक पोहणाऱ्यांनी शोध मोहीम राबवली. जालना व घनसावंगी येथून अग्नीशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने व बॅटऱ्यांच्या प्रकाशात रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.

     परंतु, शनिवारी दिवसभर व रात्रीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर रविवारी सकाळी हादगाव शिवारात कालव्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. यानंतर शकील कुरेशी यांचे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले.

     दरम्यान, डावा कालवा भरून वाहत असल्याने पोहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण येथे पोहायला शिकण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ग्रामस्थांनी व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.



Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!