Posts

Showing posts from March, 2025

बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने माजवले थैमान

Image
  शेतकऱ्यांचे नुकसान वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        ३१ मार्च, सोमवार रोजी दुपार ते सायंकाळी बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये जोरदार पाऊस झाला, तर घनसावंगी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या.     धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील तीर्थपुरी, खापरदेव हिवरा येथे जोरदार पाऊस झाला, तर शिंदे वडगाव येथे रिमझिम पावसाची नोंद झाली. एकलहेरा, पिठोरी सिरसगाव, आंतरवाली टेंभी, बाचेगाव, देवडी हादगाव, पाडोळी बुद्रुक येथेही पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळाला, मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.      बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी, मांजरसुंबा परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले. काह...

घनसावंगी: गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यावरून आजी माजी आमदाराची श्रेयवादाची लढाई

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यावरून सध्याचे आमदार हिकमत उढाण आणि माजी आमदार राजेश टोपे यांच्यात श्रेयवादाची लढाई पेटली आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपले योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.   गोदावरी नदीकाठच्या गावांना दिलासा – जायकवाडी धरणातून २ एप्रिल रोजी पाणी सोडणार     अंबड व घनसावंगी तालुक्यातील गावांमध्ये वाढत्या पाणीटंचाईमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. या परिस्थितीत ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून, बुधवार, दिनांक २ एप्रिल रोजी जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींचा लढा यशस्वी     अंबड व घनसावंगी तालुक्यातील बळेगाव, आपेगाव, साष्ट पिंपळगाव, डोमलगाव, गोरी, गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बु., गोंदी, हसनापूर, कोठाळा, साडेगाव, गंगाचिंचोली, इंदलगाव, घुंगर्डे हदगाव, भांबेरी,...

घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन विद्यार्थ्यांची MBBS मध्ये भरारी

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात यश संपादन करत ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि अढळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. हर्षवर्धनने केली डॉक्टर होण्याच्या प्रवासाची सुरुवात    घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील हर्षवर्धन शैलेंद्र पवार याने MBBS च्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत 68% मार्क घेतले आहेत. डॉक्टर होण्याच्या दिशेने पहिली पायरी पार केली आहे. बारावीनंतर त्याने CET आणि NEET च्या परीक्षांसाठी कठोर सराव केला. गत चार वर्षांपासून अखंड मेहनत घेत त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सर्व अडथळे दूर सारत आपले स्वप्न पूर्ण केले. व 1400 मार्क पैकी 948 एवढे मार्क (68 %) घेतले आहेत. शेतकरी कुटुंबातील प्रशांतची यशस्वी स्वप्नपूर्ती     घनसावंगी तालुक्यातील भादली येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत रामेश्वर नाईकनवरे याने २०२५ साली एमबीबीएस परीक्षेत उत्तम यश संपादन...

उपजिल्हाधिकाऱ्याचा छळ, हत्या कट आणि जादूटोण्याचा आरोप

Image
 पत्नी, मेहुण्यासह तिघांना अटक वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांना पत्नी, तिच्या मित्राने आणि माहेरच्यांनी मिळून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, त्यासाठी अघोरी विद्येचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्नी, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला अटक केली आहे. पत्नीच्या वर्तनामुळे सहनशीलतेचा अंत    मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र कटके यांचा २००० साली सारिका कटके हिच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. काही काळ सर्व काही सुरळीत असताना नंतर सारिकाने कटके यांना अपमानास्पद वागणूक द्यायला सुरुवात केली. कटके अनुसूचित जातीतील असल्यामुळे त्यांच्यावर जातिवाचक टीका केली जात होती. तिच्या वागण्याचा उद्देश अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी अधिकारी बनण्याचा असल्याचे कटके यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, हे शक्य न झाल्याने ती अधिक आक्रमक झाली. मध्यरात्री चॅटिंग आणि संशयास्पद वर्तन     २०१५ साली दिवाळीच्या रात्री कटके यांनी प...

बीड जिल्हा पुन्हा हादरला: भावाच्या मृत्यूचा बदला घेताना क्रूरपणे संपवले !

Image
ऐन पाडव्याच्या दिवशीची घटना  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        बीड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे, जिथे भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी धनंजय देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख यांनी स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची क्रूरपणे हत्या केली. ऐन गुढीपाडव्याच्या मंगलदिनी घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, या प्रकरणातील क्रूरता आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे बीडमध्ये निर्दयीपणाचे प्रमाण वाढले कसे? या घटनांमध्ये काही राजकीय शक्तींचे अभय मिळत आहे का, असा गंभीर प्रश्न समाजात उपस्थित होतो आहे. घटनास्थळ आणि पार्श्वभूमी      परळी तालुक्यातील सिरसाळा जवळील कान्हापूर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख नावाच्या तरुणाने स्वप्नील देशमुखच्या सातत्यपूर्ण त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर स्वप्नील देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, स्वप्नीलने सतत अविनाशच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत होता. क्रूर हत्या     सूत्र...

जालना - विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा व गारपिटीची शक्यता

Image
जालना जिल्ह्यात १ ते ३ एप्रिल पर्यंत येलो अलर्ट जारी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्हयातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात ०१/०४/२०२५ ते ०३/०४/२०२५ या कालावधीत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.       विशेषतः १ आणि २ एप्रिल रोजी जोरदार वारे (ताशी ५०-६० कि.मी.) आणि गारपीट, तर ३ एप्रिल रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांसाठी आवाहन 1. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे येत असताना झाडाखाली उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 2. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. मोटारसायकल आणि इतर धातूच्या वस्तूंपासून दूर रहावे. 3. उंच इमारती, टॉवर्स, खांब किंवा धातूच्या कुंपणांच्या आसपास थांबणे टाळावे. 4. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून कान आणि डोके झाकावे. 5. शेतकरी बांधवांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच योग्य ते नियोजन कर...

जालना - शेतकऱ्याचे अपहरण करून २५ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या ५ दरोडेखोरांना केले जेरबंद

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      शेतकऱ्याच्या अपहरणानंतर २५ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या ५ दरोडेखोरांना मौजपुरी (जालना) पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शेतकरी निवृत्ती तांगडे यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २३ मार्च रोजी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून १५००० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली होती व २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. अपहरणाचा थरार    २२ मार्चच्या रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास शेतकरी निवृत्ती तांगडे हे त्यांच्या राहत्या घराबाहेर झोपलेले असताना ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना गाडीत कोंबले. त्यानंतर जालना-मंठा हायवेवरून त्यांना एका ठिकाणी घेऊन जाऊन, त्यांच्याकडील १५००० रुपये काढून घेतले. त्यांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली, जी देण्याचे तांगडे यांनी मान्य केल्यामुळे रात्री त्यांना घोडेगाव फाट्यावर सोडून देण्यात आले. परंतु, दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता पुन्हा फोनवर धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आली. पोलीस तपासाची यशस्वी कामगिरी     ...

माळेगाव साखर कारखान्याची एकरकमी Frp देण्यात आघाडी: इतर कारखानदार आघाडी घेणार का

Image
  प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       पुणे जिल्ह्यातील माळेगाव साखर कारखाना प्रशासनाने १ ते १५ मार्च या कालावधीत गाळप केलेल्या उसाचे बिल प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकरकमी वर्ग केले आहे. अशी माहिती हाती येतेय ही रक्कम एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) पेक्षा अधिक असून, माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात प्रथमच एकरकमी एफआरपी लागू करणारा कारखाना ठरला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील माळेगाव संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे इतर साखर कारखानदारही आता एकरकमी एफआरपी लागू करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि माळेगावची पुढाकार     मुंबई उच्च न्यायालयाने एफआरपी एकरकमी देण्याचे आदेश दिल्यानंतर माळेगाव साखर कारखान्याने त्वरित पावले उचलून, राज्यातील पहिली पायरी म्हणून प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. माळेगावच्या अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपाध्यक्ष ...

सत्ताधाऱ्यांचे यू-टर्न: ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन, आता पीककर्ज भरण्याचा आदेश!

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री हरिभाऊ पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, "आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू... कोरा... कोरा!"     मात्र, सत्तेतील निर्णय वेगळेच निघाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मार्च २०२५ रोजी स्पष्टपणे सांगितले की, "३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरा... भरा... भरा!" यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप     महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ भागातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत. दुष्काळ, अनियमित पाऊस आणि शेतीमालाच्या कोसळलेल्या किमतींमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या या निर्णयाने आणखी धक्का बसला आहे. राज्यातील शेतकरी संघटनांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला असून, निवडणुकीपूर्वी फक्त मतांसाठी आश्वासन...

शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता मिळणार

Image
सहाव्या हप्त्याचा २१६९ कोटींचा लाभ ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार – कृषी मंत्री कोकाटे  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा लाभ म्हणून सुमारे २१६९ कोटी रुपयांची रक्कम दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी त्यांच्या आधार व डीबीटी (Direct Benefit Transfer) संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.    कृषी मंत्री अॅड. कोकाटे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आणि त्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ही योजना राबविली आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.    शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची योजना अॅड. कोकाटे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेतीसंबंधित गरजांसाठी थेट आर्थिक मदत मिळावी, यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक...

पोलीस अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू: महामार्गावर कारमध्ये मृतदेह आढळला

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     जालना महामार्ग पोलीस दलात नुकतेच बदलून आलेले पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर म्हस्के (वय 40) यांचा मृतदेह जालना जिल्ह्यातील देऊळगाव ते सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल शाळेजवळील स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.      ज्ञानेश्वर म्हस्के हे बीड जिल्हा पोलीस दलात 2007 साली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांची बदली जालना जिल्ह्यात झाली होती, आणि महिनाभरापूर्वीच त्यांची नियुक्ती महामार्ग पोलीस मदत केंद्र, जालना येथे झाली होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.      ज्ञानेश्वर म्हस्के हे गिरोली बुद्रुक, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.    म्हस्के यांच्या मृत्यूचा तपास सुरू असून पोलीस दल व स्थानिक प्रशासन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करत आहेत.

बीडमध्ये मशिदीमध्ये स्फोट, ईद सणाला गालबोट

Image
गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटना वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      दि २९ मार्च रोजी  रात्री दोन ते अडीचच्या सुमारास बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धामसाला गावातील मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमझान महिन्यातील या स्फोटाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका माथेफिरूने हा स्फोट घडवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र स्फोटामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे.    या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मशिदीच्या इमारतीला काही प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मशिदीतील फरशी फुटली असून, स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन तपास सुरू केला आहे. पोलीसांची तत्पर कारवाई     बीड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पहाटेपासून आरोपींचा शोध चालू आहे. आरोपींवर तलवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, स्फोटकं कुठून आली आणि आरोपीचा नेमका हेतू काय होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समो...

स्नेहश्री मल्टीस्टेट बँक अंबड येथे चोरी व फसवणूक प्रकरणात तीन आरोपींना अटक

Image
  संगणक आणि प्रिंटर जोगलादेवी बंधाऱ्यात फेकले  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       स्नेहश्री मल्टीस्टेट बँक, अंबड येथे झालेल्या चोरी आणि फसवणूक प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी जगन्नाथ गणेश तिकांडे (वय ३३, रा. शेवगा, ता. अंबड, जि. जालना) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी बँकेत कर्ज घेण्यासाठी काही कोरे चेक बँकेच्या मॅनेजर सुनिल बाप्पासाहेब कुढेकर यांच्याकडे दिले होते. कर्जाची परतफेड केल्यानंतर फिर्यादीने चेक परत मागितले असता बँकेने ते नाकारले.   फिर्यादीच्या तक्रारीनुसार, बँकेच्या मॅनेजरने इतर आरोपींसोबत संगणमत करून बनावट आधारकार्डच्या मदतीने फिर्यादीच्या खात्यातून ६५ हजार  रुपये चेकद्वारे काढून फसवणूक केली. यावरून पोलीस ठाणे अंबड येथे गु.र.क्र . 154/2025 , भा. न्या. सं. अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.     पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून मॅनेजर सुनिल कुढेकर यास ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता, त्याने इतर  आरोपी १) आदर्श आनंद मस्के (वय २१, रा. बनगाव, ता. अंबड) २) प्रशांत प्रकाश ब...

घनसावंगी- शेतकऱ्याची दुचाकी दिवसाढवळ्या लांबवली;

Image
चोरटा रंगेहात पकडला वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते रामसगाव रोडवर, २९ मार्च शनिवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास शेतकऱ्याची दुचाकी दिवसाढवळ्या लांबवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे चोरटा रंगेहात पकडला गेला. या घटनेत अशोक जगन वाजे (रा. तीर्थपुरी) या शेतकऱ्याची दुचाकी लांबवण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला होता. अशी माहिती मिळाली.      शेतकरी अशोक वाजे शेतीच्या कामासाठी रामसगाव रोडवरील आपल्या शेतात गेले होते. त्यांनी लिंबाच्या झाडाखाली आपल्या दुचाकी (क्रमांक MH 21 BV 7226) लावली होती. यावेळी अपाचे गाडीवर तीन अज्ञात चोरटे आले आणि शेतकऱ्याची दुचाकी हेरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या रस्त्यावर सतत वर्दळ असल्याने त्यांचा डाव पटकन साधता आला नाही.     शेवटी, या चोरांपैकी एकाने शेतकऱ्याची दुचाकी घेऊन धूम ठोकली. शेतकऱ्याला या घटनेची जाणीव झाल्यानंतर त्यांनी जोगलादेवी, रामसगाव, भोगलगाव, बोरगाव या ठिकाणी संपर्क साधून चोरट्याला पकडण्याची सूचना दिली. त्यानंतर, भोगलगाव येथे या दुचाकी चोराला रंगे...

मळीचा टँकर थेट शेतकऱ्याच्या घरावर पलटी : नुकसान भरपाईची मागणी

Image
  घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-रामसगाव रोडवरील घटना  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते रामसगाव रस्त्यावर मोठा अपघात घडला आहे. मळीने भरलेला टँकर (क्रमांक MH 04 FU 5420) शनिवारी, २९ मार्च रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजताच्या सुमारास थेट शेतकऱ्याच्या घरावर पलटी झाला. या घटनेत शेतकरी आकाश सखाराम हिवाळे यांच्या घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, मळी भरून टँकर तीर्थपुरीहून रामसगावकडे जात असताना अचानक अनियंत्रित झाला आणि हिवाळे यांच्या शेतातील घरावर पलटी झाला. या अपघातामुळे घराचे छत आणि बांधकाम कोसळले, तसेच घरातील संपूर्ण साहित्यावर मळी पसरली. यामुळे घरगुती सामानासह शेतातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.      शेतकरी आकाश हिवाळे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. संबंधित कंपनीने किंवा वाहकाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

Image
  महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र पोलिस दलातील प्रतिष्ठित आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणात झालेल्या भीषण अपघातात निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे प्रवास करत असताना, त्यांच्या कारची ट्रकसोबत भीषण धडक झाली, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेले एक नातेवाईकही मृत्युमुखी पडले.      सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि सध्या मुंबई पोलिस दलात पोर्ट झोनचे उपायुक्त (डीसीपी) म्हणून कार्यरत होते. आपल्या नातेवाईकांसह ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जात असताना, हा दुर्दैवी अपघात घडला. त्यांच्या अपघाताची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिस दलाला कळवली आहे.     सुधाकर पठारे यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी आणि सेवा क्षेत्रातील विशेष मानली जाते. १९९५ साली स्पर्धा परीक्षा देऊन ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले होते. १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक पदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आपली सेवा बजावली. पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, आणि ...

जिल्हा परिषद शाळा झाली हायटेक शाळा: इंग्लिश स्कूलला लाजवेल अशा सुविधा

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देवहिवरा आता एक अत्याधुनिक शाळा म्हणून ओळखली जात आहे. ही शाळा सध्या जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक उत्तम उदाहरण ठरत आहे, ज्यामुळे इंग्लिश शाळांनाही लाजवेल असा या शाळेचा दर्जा आहे. या शाळेची भव्य-दिव्य इमारत, डिजिटल लायब्ररी, आणि दोन ते तीन एकरचे मोठे खेळाचे मैदान विशेष आकर्षण ठरली आहेत.      शाळेमध्ये विविध खेळांसाठी उत्तम सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट साहित्य, लेझीम, रिंग यांसारखे विविध खेळ समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ही सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहेत. खेळासोबतच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी डिजिटल लायब्ररीचीही मोठी भूमिका आहे.     शाळेला स्टार्स प्रकल्पाअंतर्गत डिजिटल लायब्ररीची स्थापना करण्यासाठी एका कंपनीकडून दहा टॅब भेट देण्यात आले आहेत. हे टॅब विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा देणार आहेत, ज्यामुळे त्यांचे शिक्षण अधिक इंटरएक्टिव्ह व सुसंगत होणार आहे.     ...

IDBI बँक शाखेचा सामाजिक उपक्रम: शाळांना वॉटर फिल्टर आणि संगणक संच भेट

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील IDBI बँक तीर्थपुरी शाखेने आपल्या सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून चार जिल्हा परिषद शाळांना वॉटर फिल्टर आणि संगणक संच भेट देऊन एक अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लागेल. खापदेव हिवरा येथील शाळेस वॉटर फिल्टर     या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आले. यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पावले उचलली आहेत. भायगव्हाण, दहीगव्हाण येथील शाळांना संगणक संच आणि प्रिंटर    तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख आणि वापर आवश्यक आहे. त्यामुळे या शाळांना संगणक संच आणि प्रिंटर प्रदान केले गेले, ज्यामुळे त्यांचे डिजिटल शिक्षण सुलभ होईल. खड्का येथील शाळेस तीन पंखे    उन्हाळ्यातील उष्णतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी खड्का येथील शाळेला तीन पंखे भेट देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना थंड...