घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन विद्यार्थ्यांची MBBS मध्ये भरारी

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात यश संपादन करत ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि अढळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.


हर्षवर्धनने केली डॉक्टर होण्याच्या प्रवासाची सुरुवात

   घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील हर्षवर्धन शैलेंद्र पवार याने MBBS च्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत 68% मार्क घेतले आहेत. डॉक्टर होण्याच्या दिशेने पहिली पायरी पार केली आहे. बारावीनंतर त्याने CET आणि NEET च्या परीक्षांसाठी कठोर सराव केला. गत चार वर्षांपासून अखंड मेहनत घेत त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सर्व अडथळे दूर सारत आपले स्वप्न पूर्ण केले. व 1400 मार्क पैकी 948 एवढे मार्क (68 %) घेतले आहेत.


शेतकरी कुटुंबातील प्रशांतची यशस्वी स्वप्नपूर्ती

    घनसावंगी तालुक्यातील भादली येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत रामेश्वर नाईकनवरे याने २०२५ साली एमबीबीएस परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. त्याने अंतिम वर्षाच्या परीक्षेत ६१.५०% गुण मिळवत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला. या परीक्षेत त्याला १४०० पैकी ८६१ गुण मिळाले, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.


आदित्य मुकणेने मिळवले प्रथम श्रेणीमध्ये यश

   घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी भागवत मुकणे यांचा मुलगा आदित्य भागवत मुकणे यानेही MBBS परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.


ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण

   या ग्रामीण भागातील तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातही मोठे स्वप्न पूर्ण करता येते, हे सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या