बीड जिल्हा पुन्हा हादरला: भावाच्या मृत्यूचा बदला घेताना क्रूरपणे संपवले !

ऐन पाडव्याच्या दिवशीची घटना 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     बीड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे, जिथे भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी धनंजय देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख यांनी स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची क्रूरपणे हत्या केली. ऐन गुढीपाडव्याच्या मंगलदिनी घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, या प्रकरणातील क्रूरता आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे बीडमध्ये निर्दयीपणाचे प्रमाण वाढले कसे? या घटनांमध्ये काही राजकीय शक्तींचे अभय मिळत आहे का, असा गंभीर प्रश्न समाजात उपस्थित होतो आहे.

घटनास्थळ आणि पार्श्वभूमी

     परळी तालुक्यातील सिरसाळा जवळील कान्हापूर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख नावाच्या तरुणाने स्वप्नील देशमुखच्या सातत्यपूर्ण त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर स्वप्नील देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, स्वप्नीलने सतत अविनाशच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत होता.



क्रूर हत्या

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नीलच्या त्रासाला कंटाळून अखेर अविनाशचा भाऊ धनंजय देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख यांनी त्याला संपवण्याचे ठरवले. दोघांनी मिळून स्वप्नीलला त्या झाडाखाली नेले, जिथे अविनाशने गळफास लावून आत्महत्या केली होती. तिथेच गळा चिरून आणि दगडाने ठेचून स्वप्नीलला क्रूरपणे संपवण्यात आले.


पोलिसांच्या ताब्यात आरोपी

    या घटनेनंतर धनंजय आणि सोनाली दोघेही स्वतःच सिरसाळा पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, "भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केले," अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.


बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण

    बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रविवारी मशिदीजवळ घडलेला बॉम्बस्फोट, तर सोमवारी लगेचच या क्रूर हत्येची घटना समोर आली. त्यामुळे जिल्ह्यात तणाव वाढला आहे. दरम्यान, अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने काही स्थानिक राजकीय व्यक्तींनी गुन्हेगारीला अभय तर दिलं नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.


संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण

   या हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यात भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!