मळीचा टँकर थेट शेतकऱ्याच्या घरावर पलटी : नुकसान भरपाईची मागणी
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-रामसगाव रोडवरील घटना
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते रामसगाव रस्त्यावर मोठा अपघात घडला आहे. मळीने भरलेला टँकर (क्रमांक MH 04 FU 5420) शनिवारी, २९ मार्च रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजताच्या सुमारास थेट शेतकऱ्याच्या घरावर पलटी झाला. या घटनेत शेतकरी आकाश सखाराम हिवाळे यांच्या घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मळी भरून टँकर तीर्थपुरीहून रामसगावकडे जात असताना अचानक अनियंत्रित झाला आणि हिवाळे यांच्या शेतातील घरावर पलटी झाला. या अपघातामुळे घराचे छत आणि बांधकाम कोसळले, तसेच घरातील संपूर्ण साहित्यावर मळी पसरली. यामुळे घरगुती सामानासह शेतातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी आकाश हिवाळे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. संबंधित कंपनीने किंवा वाहकाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment