अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

 महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


    महाराष्ट्र पोलिस दलातील प्रतिष्ठित आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणात झालेल्या भीषण अपघातात निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे प्रवास करत असताना, त्यांच्या कारची ट्रकसोबत भीषण धडक झाली, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेले एक नातेवाईकही मृत्युमुखी पडले.

     सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि सध्या मुंबई पोलिस दलात पोर्ट झोनचे उपायुक्त (डीसीपी) म्हणून कार्यरत होते. आपल्या नातेवाईकांसह ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जात असताना, हा दुर्दैवी अपघात घडला. त्यांच्या अपघाताची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिस दलाला कळवली आहे.

    सुधाकर पठारे यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी आणि सेवा क्षेत्रातील विशेष मानली जाते. १९९५ साली स्पर्धा परीक्षा देऊन ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले होते. १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक पदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आपली सेवा बजावली. पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, आणि राजुरा येथे त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले.

    पठारे यांनी चंद्रपूर आणि वसई येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून सेवा दिली, तसेच अमरावती सीआयडी पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, आणि नवी मुंबई येथे पोलिस उपायुक्त पदावर काम करताना त्यांनी संघटित गुन्हेगारी, मोक्का, तडीपारी, आणि एमपीडीएसारख्या गंभीर कायदे अंमलबजावणीची धडक मोहीम राबवली.

   पोलिस दलात त्यांनी विविध उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्था राखली. सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली असून, त्यांच्या योगदानाची आठवण सदैव ताजी राहील.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या