घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

उपजिल्हाधिकाऱ्याचा छळ, हत्या कट आणि जादूटोण्याचा आरोप

 पत्नी, मेहुण्यासह तिघांना अटक



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांना पत्नी, तिच्या मित्राने आणि माहेरच्यांनी मिळून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, त्यासाठी अघोरी विद्येचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्नी, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला अटक केली आहे.


पत्नीच्या वर्तनामुळे सहनशीलतेचा अंत

   मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र कटके यांचा २००० साली सारिका कटके हिच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. काही काळ सर्व काही सुरळीत असताना नंतर सारिकाने कटके यांना अपमानास्पद वागणूक द्यायला सुरुवात केली. कटके अनुसूचित जातीतील असल्यामुळे त्यांच्यावर जातिवाचक टीका केली जात होती. तिच्या वागण्याचा उद्देश अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी अधिकारी बनण्याचा असल्याचे कटके यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, हे शक्य न झाल्याने ती अधिक आक्रमक झाली.


मध्यरात्री चॅटिंग आणि संशयास्पद वर्तन

    २०१५ साली दिवाळीच्या रात्री कटके यांनी पत्नीला कोणाशीतरी चॅटिंग करताना पाहिले. त्यांनी हा प्रकार तिच्या आई आणि भावाला सांगितला. त्यानंतर काही काळ परिस्थिती निवळली. मात्र, २०१९ साली कटके मुंबईत नोकरी करत असताना, पत्नी आणि मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्येच राहत होते. २०२१ मध्ये सारिकाने जालना जिल्ह्यातील बोरखडी येथे ग्रीनलँड स्कूल सुरू केले, जिथे विनोद उबाळे या मित्राचे हॉटेल होते.


अश्लील छायाचित्रे आणि अघोरी विद्या

    कटके यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आढळले. तसेच, विनोद उबाळे हा अघोरी विद्या जाणणारा असून, सारिकाच्या मदतीने त्याने कटके यांच्या जीवावर बेतणारा जादूटोणा केला. अघोरी विद्येच्या माध्यमातून कटके यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.


पोलिसांची कारवाई, तिघांना अटक

   या प्रकरणात विनोद उबाळे, पत्नी सारिका देवेंद्र कटके, सासू सुवर्णा साहेबराव देशमुख, मेहुणा आतिष देशमुख, घरातील कामगार छायाबाई बालाजी गायकवाड आणि शाळेतील कामगार संगीता (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सातारा पोलिसांनी विनोद उबाळे, सारिका कटके आणि आतिष देशमुख यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या