जालना - विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा व गारपिटीची शक्यता

जालना जिल्ह्यात १ ते ३ एप्रिल पर्यंत येलो अलर्ट जारी



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्हयातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात ०१/०४/२०२५ ते ०३/०४/२०२५ या कालावधीत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

     विशेषतः १ आणि २ एप्रिल रोजी जोरदार वारे (ताशी ५०-६० कि.मी.) आणि गारपीट, तर ३ एप्रिल रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.


नागरिकांसाठी आवाहन

1. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे येत असताना झाडाखाली उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

2. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. मोटारसायकल आणि इतर धातूच्या वस्तूंपासून दूर रहावे.

3. उंच इमारती, टॉवर्स, खांब किंवा धातूच्या कुंपणांच्या आसपास थांबणे टाळावे.

4. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून कान आणि डोके झाकावे.

5. शेतकरी बांधवांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच योग्य ते नियोजन करावे.

6. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

   जिल्ह्यातील नागरीकांनी आपत्तीच्या वेळी जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. संपर्क क्रमांक: जिल्हाधिकारी कार्यालय, जालना: (02482)-223132. टोल फ्री: 1077

   असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!