पोलीस अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू: महामार्गावर कारमध्ये मृतदेह आढळला



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

    जालना महामार्ग पोलीस दलात नुकतेच बदलून आलेले पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर म्हस्के (वय 40) यांचा मृतदेह जालना जिल्ह्यातील देऊळगाव ते सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल शाळेजवळील स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


     ज्ञानेश्वर म्हस्के हे बीड जिल्हा पोलीस दलात 2007 साली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांची बदली जालना जिल्ह्यात झाली होती, आणि महिनाभरापूर्वीच त्यांची नियुक्ती महामार्ग पोलीस मदत केंद्र, जालना येथे झाली होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

     ज्ञानेश्वर म्हस्के हे गिरोली बुद्रुक, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

   म्हस्के यांच्या मृत्यूचा तपास सुरू असून पोलीस दल व स्थानिक प्रशासन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!