घनसावंगी- शेतकऱ्याची दुचाकी दिवसाढवळ्या लांबवली;

चोरटा रंगेहात पकडला


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते रामसगाव रोडवर, २९ मार्च शनिवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास शेतकऱ्याची दुचाकी दिवसाढवळ्या लांबवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे चोरटा रंगेहात पकडला गेला. या घटनेत अशोक जगन वाजे (रा. तीर्थपुरी) या शेतकऱ्याची दुचाकी लांबवण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला होता. अशी माहिती मिळाली.

     शेतकरी अशोक वाजे शेतीच्या कामासाठी रामसगाव रोडवरील आपल्या शेतात गेले होते. त्यांनी लिंबाच्या झाडाखाली आपल्या दुचाकी (क्रमांक MH 21 BV 7226) लावली होती. यावेळी अपाचे गाडीवर तीन अज्ञात चोरटे आले आणि शेतकऱ्याची दुचाकी हेरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या रस्त्यावर सतत वर्दळ असल्याने त्यांचा डाव पटकन साधता आला नाही.

    शेवटी, या चोरांपैकी एकाने शेतकऱ्याची दुचाकी घेऊन धूम ठोकली. शेतकऱ्याला या घटनेची जाणीव झाल्यानंतर त्यांनी जोगलादेवी, रामसगाव, भोगलगाव, बोरगाव या ठिकाणी संपर्क साधून चोरट्याला पकडण्याची सूचना दिली. त्यानंतर, भोगलगाव येथे या दुचाकी चोराला रंगेहात पकडण्यात आले.

    या घटनेची माहिती तीर्थपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन चोरट्याला ताब्यात घेतले आणि त्याला पुढील तपासासाठी पोलिस ठाण्यात आणले.

    दरम्यान या घटनेमुळे शेतकऱ्यांनी आणखीन सावध होऊन आपल्या दुचाकीकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे 

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!