Posts

Showing posts from September, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शशिकांत हातगल जालन्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

Image
उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना-आदेश जाहीर वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबत महत्त्वाचा आदेश दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केला आहे. प्रशासकीय कारणास्तव व सार्वजनिक सेवेच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.     शासन आदेश क्र. बदली-०९२५/प्र.क्र. २२३/९/आस्था-२ (ई-१३५२१०२) नुसार, उप जिल्हाधिकारी शशिकांत हातगल यांची उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जालना या पदावरून निवासी उप जिल्हाधिकारी, जालना या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.    संबंधित अधिकाऱ्यांनी २६ सप्टेंबर २०२५ पासून कार्यमुक्त होऊन नव्या पदावर तात्काळ रुजू व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सदरील आदेश उप सचिव महेश वरूडकर यांनी काढला आहे.     दरम्यान, शशिकांत हातगल यांनी यापूर्वी काही वर्षे अंबड येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले होते. त्यावेळी निवडणूक विभागात काम करत असताना त...

जालना अनुदान घोटाळा प्रकरणी पाच अधिकारी निलंबित

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शासकीय अनुदानाच्या वाटपात अनियमितता आणि घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत जालना जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. पी. एम. मिन्नू यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.     या निलंबनामुळे ग्रामपंचायत अधिकारी वर्गात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.     निलंबित अधिकाऱ्यांमध्ये घनसावंगी तालुक्यातील एस. जे. चांदणे (भेंडाळा), एन. डी. बरीदे (घाणेगाव), एस. पी. देवगुंडे (घोन्सी तांडा), डी. बी. नरळे (बाणेगाव) व एम. टी. रुपनर (गुरुपिंप्री) यांचा समावेश आहे. घोटाळ्याचा आरोप     जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशानुसार बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे अशी अपेक्षा होती. मात्र अनुदान वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकड...

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता वाढली

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्यावर दिसू लागला असून, २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांत ढगाळ हवामानासोबत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सूनच्या माघारीला अद्याप विलंब होणार असून, किमान ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून त्याचा निरोप होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.     दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारनंतर दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात हवामानात बदल होऊन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ व मराठवाड्यात आभाळी हवामान राहून हलक्या सरी कोसळू शकतात.     दरम्यान, दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाक...

जालना अनुदान घोटाळा प्रकरण : तलाठींना मदत करणारे कोतवाल व एजंट अटकेत

Image
  तीन आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाटपामध्ये तब्बल ₹२४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, जालना पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.      अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. आधीच महसूल अधिकाऱ्याला अटक     या प्रकरणात यापूर्वी सहाय्यक महसूल अधिकारी सुशिलकुमार दिनकर जाधव यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यानंतर तहसील कार्यालय, अंबड येथे कार्यरत तलाठी शिवाजी श्रीधर ढालके (रा. उमरी बाजार, ता. दर्यापुर, जि. अमरावती) यांना १९ सप्टेंबर रोजी अटक करून पीसीआर मध्ये ठेवण्यात आले आहे. तपासात ढालके यांनी त्यांच्या मूळ गावी उमरी बाजारातील ५० हून अधिक लोकांची नावे अंबड तालुक्याती...

अंबड- घनसावंगीत पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकीस्वाना लुटले

Image
  तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास; परिसरात भीतीचे वातावरण वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकी स्वरांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना आज २० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.     घनसावंगी तालुक्यातील रामसगाव फाट्याजवळ २० सप्टेंबर रोजी सकाळी चार अज्ञात भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून साडेगाव येथील शेतकरी रमेश बाबुराव खोजे यांना दोन दुचाकीवरील चार जणांनी अडवले तीर्थपुरीत खून झाला आहे, तुम्ही सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरत आहात? असे सांगून संशयितांनी खोजे यांच्याकडील दोन अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर त्या अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधल्या व आमच्या साहेबांना दाखवतो असा बहाणा करून दुसऱ्या पुडीत ठेवलेल्या नकली अंगठ्या देत खऱ्या अंगठ्या घेऊन आरोपी फरार झाले     या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस जमादार विष्णू चव्हाण यांनी दिली.      दरम्यान आजच गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

२५ कोटींचे अतिवृष्टी अनुदान लाटणारा आरोपी अमरावतीहून जेरबंद

Image
जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई  जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी अमरावतीहून जेरबंद   वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील गाजलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा, जालना येथील पथकाने अमरावती शहरातून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींनी स्वतःचे नातेवाईक, मित्रपरिवार व ओळखीच्या लोकांची नावे बनावटपणे नैसर्गिक आपत्ती अनुदान यादीत दाखल करून शासनाकडून तब्बल ₹ २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ इतकी रक्कम बेकायदेशीरपणे लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशाने गठीत चौकशी समितीने तपास करताना या प्रकरणातील आरोपींनी – दुबार व बनावट नावे समाविष्ट केली,  जिरायत जमीन बागायत म्हणून दाखवली,  शासकीय गायरान जमिनीवर हक्क दाखवला,  क्षेत्रवाढ दाखवून अनुदान मिळवले, असा गंभीर प्रकार केल्याचे स्पष्ट केले. या निष्कर्षानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आधीच एक आरोपी तुरुंगात या प्रकरणातील पहिला अटक आरोपी सुशिलकुमार दिनक...

पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Image
मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विवेक जॉन्सन (भा.प्र.से.) यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.      जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी केलेल्या आदेशानुसार, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचा या सुट्टीत समावेश आहे.      ही कारवाई आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.   ...

जालना जिल्ह्यात १५- १९ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट

Image
  नागरिकांना दक्षतेचे आवाहन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांसाठी सूचना 1. मेघगर्जना व वीजा चमकत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे. 2. गडगडाटी वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये. विद्युतवाहक भागांपासून दूर रहावे. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल किंवा सायकल यांचा वापर टाळावा. 3. मोकळ्या मैदानात, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा अधांतरी लटकणाऱ्या तारांपासून दूर रहावे. 4. वीजा चमकत असताना मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून हात कानांवर ठेवावेत ...

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

Image
शासनाची अधिसूचना जारी ! ११ सर्वसाधारण महिलांसाठी, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरूवात वास्तव न्युज मराठी ओमप्रकाश उढाण        महाराष्ट्र शासनाने अखेर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे नवे आरक्षण जाहीर केले आहे. ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदा अध्यक्षपदांचे वाटप नव्याने करण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) तसेच महिलांना आरक्षणाचा समावेश असून, विशेष बाब म्हणजे यंदा तब्बल ११ जिल्ह्यांत अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण फेरवाटप        ग्रामविकास विभागाने कळविले की, सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ या प्रकरणातील आदेशानुसार आधीचे आरक्षण रद्द करून नव्याने वाटप करण्यात आले आहे. ज्यांना पूर्वी आरक्षणाचा लाभ झाला नव्हता, अशा जिल्हा परिषदा आता या फेरवाटपात समाविष्ट झाल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण? नव्या यादीप्रमाणे – सर्वसाधा...

नर्तिकेच्या लयीत हृदय अडकलं, उप सरपंचाचं आयुष्यच थांबलं

Image
  गेवराईतील उपसरपंचाचा गोळीबारात मृत्यू : कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने हळहळ वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३८) यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) उघडकीस आली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गाव शिवारात त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गेवराई तालुक्यात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनाक्रम     मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गोविंद बरगे खासगी कामानिमित्त कारने बार्शीला गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेर त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला. गोविंद बरगे यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे निष्पन्न झाले असून कारच्या आत पिस्तुलही सापडले. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत अद्यापही संशय कायम आहे.     घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. नर्तिकेव...

जालना - ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाच घेताना पकडले

Image
घरकुलाचा पहिला हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी मागितली लाच  वास्तव न्युज मराठी ओमप्रकाश उढाण        लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना युनिटच्या पथकाने आज यशस्वी सापळा कारवाई करून ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला आज सोमवारी लाच घेताना रंगेहात पकडले.     तक्रारदार (वय ३६) यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा पहिला हप्ता खात्यावर जमा करून देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. ही मागणी नारायण रमेशराव खंडागळे (वय ३२, रा. शेवगा, ता. जालना), शेवगा-सारवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचे पती यांनी केली.     तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत पथकाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष लाच मागणीची खात्री दिल्यानंतर आज (८ सप्टेंबर) दोस्ती वडापाव सेंटरजवळ, नेर (ता. जालना) येथे कारवाई करण्यात आली. आरोपीने तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.    आरोपीकडून लाचेची रक्कम तिन हजार रुपये, २४० रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात...

गणपती विसर्जनाची तयारी करत असताना शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Image
गणपती विसर्जनाच्या दिवशी दुर्दैवी घटना  ✍️ वास्तव न्युज : ओमप्रकाश उढाण       घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज (शनिवार) सकाळी गणेश विसर्जनाच्या दिवशी अतिशय हृदयद्रावक घटना घडली. गणपती मंडळाच्या ठिकाणी विजेच्या लाईनचा शॉक लागून अभिषेक ज्ञानदेव गिराम (वय १४) या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीर्थपुरीसह परिसरात शोककळा पसरली आहे.       अभिषेक हा ज्ञानदेव गिराम यांचा एकुलता एक मुलगा होता. आता अचानक अभिषेकचाही विजेच्या शॉक मुळे मृत्यू झाल्याने गिराम कुटुंबावर आकाश कोसळल्यासारखी वेळ आली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील सर्वच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.     या दुर्घटनेबद्दल सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त होत असून, ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.     दरम्यान या घटनेमुळे लाईन/लाईट चे काम करताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच लहान बालकांनी व युवकाकडे कुटुंबातील व्यक्तीने लक्ष देण्याची गरज आहे.

अंबड- घनसावंगी तालुक्यात पोलीस पाटील आरक्षण सोडत

Image
  अंबड-घनसावंगी तालुक्यात पोलिस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        अंबड तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) अंबड व घनसावंगी तालुक्यातील पोलिस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत पार पडली. ही सोडत अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाप पारधी आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक पद्धतीने पार पडली.    या सोडतीत दोन्ही तालुक्यातील एकूण १८४ रिक्त गावांचा समावेश होता. आरक्षणनिहाय गावनिहाय सोडत काढण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गाखाली निवडलेली गावे       बोरगाव खुर्द, वाडी शिराढोण, भद्रेगाव, काटखेडा, गोरी, पांगरी, गोला, रामगव्हाण खुर्द, साकळगाव, राजेगाव, अंतरवाला बु, रामगव्हाण बु, वडी रामसगाव, मंगु जळगाव, राजणीवाडी, गंधारी, अवलगाव खुर्द, रेणापुरी, अबड, शहापुर, टाका, सारंगपुर, पांगरखेडा, हातडी, बोदलापुरी, रवना, मादळा, जालुरा, अंतरवाली टेभी, बहिरेगाव, खालापुरी, साडेसावंगी, माडर्डी, रा...

जालना पोलिसांची मोठी कारवाई- ४७२ जनावर हद्दपारी

Image
गणेशोत्सव व ईद ए मिलाद पार्श्वभूमीवर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात गणेशोत्सव (दि. २७ ऑगस्टपासून) आणि ईद ए मिलाद (दि. ०५ सप्टेंबर रोजी) या दोन महत्वाच्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.     पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या सूचनेनुसार व विशेष कार्यकारी दंडाधिकारी आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील रेकॉर्डवरील ४७२ गुन्हेगारांविरुद्ध बीएनएसएस कलम १६३(३) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.     हद्दपारीत समाविष्ट आरोपींमध्ये दरोडे, जबरी चोरी, दंगल, हातभट्टी, दारु विक्री यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. पोलीस ठाण्यानुसार हद्दपारी आकडेवारी पुढीलप्रमाणे: सदर बाजार – 63               कदीम जालना – 21 तालुका जालना – 21         चंदनझिरा – 66 बदनापूर – 18                  परतूर – 24 मंठा – 40...

हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी आर जारी !

Image
  मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नवीन कार्यपद्धती : महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअर मधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत आता गावपातळीवर स्थानिक समिती गठीत करून चौकशी करण्यात येणार आहे.    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ आणि त्याअंतर्गत २०१२ चे नियम तसेच २०२४ मध्ये झालेल्या सुधारणा यांच्या आधारे ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. स्थानिक समितीची रचना : गावपातळीवर चौकशी करण्यासाठी खालील तीन सदस्यांची समिती गठीत होणार आहे – १. ग्राम महसूल अधिकारी २. ग्रामपंचायत अधिकारी ३. सहायक कृषी अधिकारी प्रक्रिया कशी असेल?     मराठा समाजातील भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणाऱ्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी नसल्यास...

माजी पोलीस निरीक्षकांनी जीवन संपवले

Image
अतिशय दुर्दैवी घटना    वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      पोलिस दलातील एका माजी पोलीस निरीक्षक यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर येत आहे.      अंबाजोगाई शहरात सोमवारी (दि.१ सप्टेंबर) रात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिस दलातील माजी पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७, रा. नागदरा, ता. परळी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली.      मिळालेल्या माहितीनुसार नागरगोजे यांनी अनेक वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले होते असे समजते. त्यांनी अंबाजोगाई येथे नवीन घर बांधण्यास सुरुवात केली होती. घराचे बांधकाम सुरू असल्याने ते तात्पुरते प्रशांत नगर परिसरात भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री ते एकटेच घरात असताना त्यांनी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.      घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह स्वाराती रुग्णालयात ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या