अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना पोलिसांची मोठी कारवाई- ४७२ जनावर हद्दपारी

गणेशोत्सव व ईद ए मिलाद पार्श्वभूमीवर


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यात गणेशोत्सव (दि. २७ ऑगस्टपासून) आणि ईद ए मिलाद (दि. ०५ सप्टेंबर रोजी) या दोन महत्वाच्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
    पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या सूचनेनुसार व विशेष कार्यकारी दंडाधिकारी आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील रेकॉर्डवरील ४७२ गुन्हेगारांविरुद्ध बीएनएसएस कलम १६३(३) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

    हद्दपारीत समाविष्ट आरोपींमध्ये दरोडे, जबरी चोरी, दंगल, हातभट्टी, दारु विक्री यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे.

पोलीस ठाण्यानुसार हद्दपारी आकडेवारी पुढीलप्रमाणे:

सदर बाजार – 63               कदीम जालना – 21

तालुका जालना – 21         चंदनझिरा – 66

बदनापूर – 18                  परतूर – 24

मंठा – 40                         आष्टी – 07

सेवली – 16                      मौजपुरी – 13

भोकरदन – 85               जाफ्राबाद – 17

पारध – 32                     हसनाबाद – 11

टेंभुर्णी – 05                    अंबड – 14

घनसावंगी – 10             गोंदी – 03

तिर्थपुरी – 06

   जालना पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादचा सण शांततेत, प्रेमभावनेत आणि सामूहिक सौहार्दाने साजरा करावा.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या