अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विवेक जॉन्सन (भा.प्र.से.) यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

     जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी केलेल्या आदेशानुसार, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांचा या सुट्टीत समावेश आहे.

     ही कारवाई आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

      तथापि, १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मात्र या सुट्टीतून वगळण्यात आले आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयाने पालक, विद्यार्थी व शिक्षकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या