घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गोविंद बरगे खासगी कामानिमित्त कारने बार्शीला गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेर त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला. गोविंद बरगे यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे निष्पन्न झाले असून कारच्या आत पिस्तुलही सापडले. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत अद्यापही संशय कायम आहे.
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणात नवीन वळण आले आहे. मृत गोविंद बरगे यांच्या मेहुण्याने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून कला केंद्रात नृत्य करणाऱ्या पूजा देविदास गायकवाड (वय २१) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २०२४ साली धाराशिव जिल्ह्यातील एका कलाकेंद्रात गोविंद बरगे यांची पूजा गायकवाडशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या नात्याचा फायदा घेत पूजाने बरगेंकडून वेळोवेळी पैसे, जमीन आणि सोनेनाणे घेतले.
मात्र काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला माझ्या नावावर करा, भावाच्या नावावर पाच एकर शेती द्या असा दबाव टाकत होती. तसे न केल्यास तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी ती देत होती, असा आरोप फिर्यादीने केला आहे. वारंवार या दबावाला कंटाळून गोविंद बरगे यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली, असे फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तपासात असे समोर आले आहे की गेल्या काही महिन्यांपासून गोविंद बरगे आणि पूजा गायकवाड यांच्यातील जवळीक वाढली होती. बरगेंनी पूजाला महागडे भेटवस्तू दिल्या होत्या, त्यात पावणेदोन लाखांचा मोबाईल फोनही होता. मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले. सोमवारी रात्री गोविंद बरगे यांनी पूजाशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात तिच्या घरी भेट दिली. त्यानंतर गावाबाहेर कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी पोलिसांनी हत्येचा पैलूही तपासायला सुरुवात केली आहे. पूजाविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या आधारे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून राजकीय व सामाजिक वर्तुळातही या घटनेची मोठी चर्चा आहे.
Comments
Post a Comment