घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील गाजलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा, जालना येथील पथकाने अमरावती शहरातून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींनी स्वतःचे नातेवाईक, मित्रपरिवार व ओळखीच्या लोकांची नावे बनावटपणे नैसर्गिक आपत्ती अनुदान यादीत दाखल करून शासनाकडून तब्बल ₹ २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ इतकी रक्कम बेकायदेशीरपणे लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशाने गठीत चौकशी समितीने तपास करताना या प्रकरणातील आरोपींनी –दुबार व बनावट नावे समाविष्ट केली, जिरायत जमीन बागायत म्हणून दाखवली, शासकीय गायरान जमिनीवर हक्क दाखवला, क्षेत्रवाढ दाखवून अनुदान मिळवले,
असा गंभीर प्रकार केल्याचे स्पष्ट केले.
या निष्कर्षानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आधीच एक आरोपी तुरुंगात
या प्रकरणातील पहिला अटक आरोपी सुशिलकुमार दिनकर जाधव याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सुरुवातीला त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडी ठोठावून त्याला जालना कारागृहात पाठविण्यात आले आहे.
फरार आरोपी अमरावतीत पकडला
फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी शिवाजी श्रीधर ढालके (वय ३४ वर्षे, व्यवसाय – नोकरी, तलाठी, तहसील कार्यालय अंबड, रा. उमरी बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती) हा अमरावती शहरात वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी पोलीस उपअधीक्षक (आ. गु. शा.) सिद्धार्थ माने, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, तसेच पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर आदींनी ही धाडसी कारवाई केली.
Comments
Post a Comment