घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
अंबाजोगाई शहरात सोमवारी (दि.१ सप्टेंबर) रात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिस दलातील माजी पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७, रा. नागदरा, ता. परळी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार नागरगोजे यांनी अनेक वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले होते असे समजते. त्यांनी अंबाजोगाई येथे नवीन घर बांधण्यास सुरुवात केली होती. घराचे बांधकाम सुरू असल्याने ते तात्पुरते प्रशांत नगर परिसरात भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री ते एकटेच घरात असताना त्यांनी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे नागरगोजे यांचे गाव नागदरा तसेच अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागरगोजे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
Comments
Post a Comment