अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

शशिकांत हातगल जालन्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना-आदेश जाहीर


वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण

   महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबत महत्त्वाचा आदेश दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केला आहे. प्रशासकीय कारणास्तव व सार्वजनिक सेवेच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


    शासन आदेश क्र. बदली-०९२५/प्र.क्र. २२३/९/आस्था-२ (ई-१३५२१०२) नुसार, उप जिल्हाधिकारी शशिकांत हातगल यांची उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जालना या पदावरून निवासी उप जिल्हाधिकारी, जालना या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.

   संबंधित अधिकाऱ्यांनी २६ सप्टेंबर २०२५ पासून कार्यमुक्त होऊन नव्या पदावर तात्काळ रुजू व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सदरील आदेश उप सचिव महेश वरूडकर यांनी काढला आहे.

    दरम्यान, शशिकांत हातगल यांनी यापूर्वी काही वर्षे अंबड येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले होते. त्यावेळी निवडणूक विभागात काम करत असताना त्यांनी नव नवीन संकल्पना राबविल्या. त्यानंतर ते उप जिल्हाधिकारी, जालना या पदावर कार्यरत होते. 

     त्यांच्या कार्यकाळात विविध प्रशासकीय कामकाज पार पाडून त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच औरंगाबाद येथेही काही दिवस त्यांनी उपजिल्हाधिकारी तथा दंडधिकारी म्हणून काम पाहिले होते.

    या पदस्थापनेनंतर आता शशिकांत हातगल हे जालना जिल्ह्यातील नवे निवासी उप जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या