अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

गणपती विसर्जनाची तयारी करत असताना शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

गणपती विसर्जनाच्या दिवशी दुर्दैवी घटना 


✍️ वास्तव न्युज : ओमप्रकाश उढाण

      घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज (शनिवार) सकाळी गणेश विसर्जनाच्या दिवशी अतिशय हृदयद्रावक घटना घडली. गणपती मंडळाच्या ठिकाणी विजेच्या लाईनचा शॉक लागून अभिषेक ज्ञानदेव गिराम (वय १४) या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीर्थपुरीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

      अभिषेक हा ज्ञानदेव गिराम यांचा एकुलता एक मुलगा होता. आता अचानक अभिषेकचाही विजेच्या शॉक मुळे मृत्यू झाल्याने गिराम कुटुंबावर आकाश कोसळल्यासारखी वेळ आली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील सर्वच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

    या दुर्घटनेबद्दल सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त होत असून, ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान या घटनेमुळे लाईन/लाईट चे काम करताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच लहान बालकांनी व युवकाकडे कुटुंबातील व्यक्तीने लक्ष देण्याची गरज आहे.


Comments

Popular posts from this blog