घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता वाढली


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्यावर दिसू लागला असून, २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांत ढगाळ हवामानासोबत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सूनच्या माघारीला अद्याप विलंब होणार असून, किमान ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून त्याचा निरोप होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारनंतर दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात हवामानात बदल होऊन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ व मराठवाड्यात आभाळी हवामान राहून हलक्या सरी कोसळू शकतात.

    दरम्यान, दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

   हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामकाजात काळजी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. काढणी केलेली पिके व तुरीच्या शेतातील कडबा पावसापासून सुरक्षित ठेवावा, तसेच मळणीसाठी टाकलेला माल झाकून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    यामुळे, आधीच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक ठरणार आहेत. पिके, धान्य आणि जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या