घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज मराठी ओमप्रकाश उढाण
तक्रारदार (वय ३६) यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा पहिला हप्ता खात्यावर जमा करून देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. ही मागणी नारायण रमेशराव खंडागळे (वय ३२, रा. शेवगा, ता. जालना), शेवगा-सारवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचे पती यांनी केली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत पथकाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष लाच मागणीची खात्री दिल्यानंतर आज (८ सप्टेंबर) दोस्ती वडापाव सेंटरजवळ, नेर (ता. जालना) येथे कारवाई करण्यात आली. आरोपीने तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.
आरोपीकडून लाचेची रक्कम तिन हजार रुपये, २४० रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई सापळा पथकातील पोहेकॉ. श्रीनिवास गुड्डुर, पोलिस अमलदार शिवलिंग खुळे, अमोल चेके, संदीप लहाने, अशोक राऊत तसेच चालक पोहेका विठ्ठल कापसे यांनी केली.
Comments
Post a Comment