घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना अनुदान घोटाळा प्रकरण : तलाठींना मदत करणारे कोतवाल व एजंट अटकेत

 तीन आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

       अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाटपामध्ये तब्बल ₹२४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, जालना पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

     अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

आधीच महसूल अधिकाऱ्याला अटक

    या प्रकरणात यापूर्वी सहाय्यक महसूल अधिकारी सुशिलकुमार दिनकर जाधव यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यानंतर तहसील कार्यालय, अंबड येथे कार्यरत तलाठी शिवाजी श्रीधर ढालके (रा. उमरी बाजार, ता. दर्यापुर, जि. अमरावती) यांना १९ सप्टेंबर रोजी अटक करून पीसीआर मध्ये ठेवण्यात आले आहे. तपासात ढालके यांनी त्यांच्या मूळ गावी उमरी बाजारातील ५० हून अधिक लोकांची नावे अंबड तालुक्यातील सजेतील दाढेगाव येथे दाखल करून त्यातून बोगस लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

एजंट व कोतवालांचा सहभाग

    तपासादरम्यान तलाठ्यांना सहाय्य करणाऱ्या एजंट आणि कोतवालांचा थेट सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे

1. कोतवाल मनोज शेषराव उघडे (रा. दाढेगाव, ता. अंबड)

2. खाजगी सहाय्यक साहेबराव उत्तमराव तुपे (रा. पिठोरी सिरसगाव, ता. अंबड)

    यांना काल रात्री अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

घोटाळ्याची पद्धत

    तलाठ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस नावे अनुदान यादीत टाकण्यासाठी एजंट व सहाय्यकांचा वापर केला. त्याबदल्यात या एजंटांना टक्केवारीनुसार आर्थिक लाभ देण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकारातून मोठा अपहार झाल्याने पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांची कारवाई

    ही कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (आर्थिक गुन्हे शाखा) सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेत पोलिस निरीक्षक मिथुन घुगे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

   

Comments

  1. अनुदान घोटाळा झाला बरोबर आहे?
    यांनी आमचे खाल्लेले अनुदान आम्हाला कधी जमा होणार आहे सध्या खूप गरज आहे एक तर पाऊस खूप झाला आहे

    ReplyDelete
  2. तपास करत रहा पण आमचे थाबुन ठेवलेले आनुदान आता तरी द्या कारण पहीले खालले तलाठ्यांनी आता चे पिक पावसाने नष्ट केले गरज आहे आता राहिलेल्या अनुदानाची प्रतिशह पाहनी करणार झाडे आहे का अनुदान 2022चे आता पाहणी करणार 23 व24ला पाणी टंचाई होती ज्याचे फळ बाग जळ ली त्यांचा काय पहणार आणी शेतकर्याची चुक आहे का मा जिल्हाधिकारी साहेब यांना विनती आहे जे राहीले ते खरे शेतकरी आहे त्यांचा अन्त आता पाहु नका अनुदान लगेच टाका पाहणी या अगोदरच झाली पण पुन्हा पाहणी होईल केव्हा पैसे टाकणार केव्हा साहेब

    ReplyDelete
  3. सरकारची चूक आहे बोगस लोक आणून बसवतात.
    जे झालं ते झालं परंतु लाभापासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही....

    ReplyDelete
  4. आजुन आरोपी पकडा ,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या