अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंबड- घनसावंगीत पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकीस्वाना लुटले

 तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास; परिसरात भीतीचे वातावरण


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करत दोन दुचाकी स्वरांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना आज २० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.

    घनसावंगी तालुक्यातील रामसगाव फाट्याजवळ २० सप्टेंबर रोजी सकाळी चार अज्ञात भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून साडेगाव येथील शेतकरी रमेश बाबुराव खोजे यांना दोन दुचाकीवरील चार जणांनी अडवले तीर्थपुरीत खून झाला आहे, तुम्ही सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरत आहात? असे सांगून संशयितांनी खोजे यांच्याकडील दोन अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर त्या अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधल्या व आमच्या साहेबांना दाखवतो असा बहाणा करून दुसऱ्या पुडीत ठेवलेल्या नकली अंगठ्या देत खऱ्या अंगठ्या घेऊन आरोपी फरार झाले 

   या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस जमादार विष्णू चव्हाण यांनी दिली.

     दरम्यान आजच गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वडीगोद्री परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले असून आम्ही सिआयडी आहोत तुम्ही सोन्याच्या अंगठ्या कशाला घालून फिरता असे सांगून वरील प्रमाणेच लूट केली अशी माहिती मिळाली. या दोन्ही घटनेत तिन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या.

    दिवसाढवळ्या झालेल्या या लुटींमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर खात्री केल्याशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या