गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात दहा प्रवासी जागीच ठार

गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात दहा प्रवासी जागीच ठार ;तर पंचवीस जण जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही बसचा आज शुक्रवार रोजी दुर्दैवी अपघात होऊन या भीषण अपघातात जवळपास १० प्रवासी जागीच ठार तर २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती हाती येतेय. गोंदिया जिल्ह्यात बस चा भीषण अपघात झाला आहे. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ शिवशाही बस अनियंत्रित झाली, रोडाच्या बाजूला उलटल्याने यात आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २५ च्या जवळ लोक जखमी असुन, जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा असे निर्देश देण्यात आलेत l. नातेवाईकांना संपर्क करता यावा, जखमींना वेळेवर औषध उपचार आणि आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात म्हणून पोल...