घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार खरीप पिक विमा

 जालना जिल्ह्यातील

 शेतकऱ्यांना कधी  मिळणार

 खरीप पिक विमा !


पीक विम्याची ४१२.३० कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार..! 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मुग व उडिद या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे जालना जिल्ह्यातील ४१२.३० कोटींची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिली होती मात्र अद्याप पर्यंत नोव्हेंबर महिना संपत आला तरीही पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

   जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पिक नुकसानी बाबत एकूण ४ लाख ८७ हजार ८३४ पूर्वसूचना विमा कंपनीस प्राप्त झालेले आहे. त्यानुषंगाने युनिव्हर्सल - सोंपो जनरल इंन्शुरन्स कंपनीस पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे बाबत सूचना देण्यात आलेल्या असून त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली होती.

  जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी. इतके असून सन २०२४-२५ मध्ये ८१२.४ मिमी. इतका पाऊस पडलेला आहे व त्याधी सरासरीच्या तुलनेत १३४.९ टक्के इतकी आहे. जालना जिल्ह्याचे माहे सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १४१.८ मिमी. इतके असून सन २०२४-२५ मध्ये २२१६.९ मिमी. इतका पाऊस पडलेला आहे व त्याची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १६० १ टक्के इतकी आहे. माहे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद, फळपिकांचे असे एकूण २ लाख ५५ हजार ५१९.९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यानुसार २ लाख ८२ हजार ५३८ शेतकऱ्यांना ४१२.३० कोटी रक्कमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिली होती.

  मात्र आता नोव्हेंबर महिना संपत आला तरीही पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही म्हणून ही रक्कम कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


प्रतिक्रिया 


   जालना जिल्ह्यातील खरीप २०२४ पिक विम्याचे अनुषंगाने जवळपास ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून संबंधित विमा कंपनीकडून सर्वे पूर्ण करून कंपनीला तात्काळ विमा वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा रक्कम मिळेल.


   – जे. आर. कापसे, जिल्हा कृषी अधीक्षक जालना


  अग्रीम पिक विमा आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची आर्थिक मदत शेतकऱ्यांना आठ दिवसात तात्काळ अदा करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.


 –सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या