घनसावंगी विधानसभा मतमोजणीसाठी १७६ तर २१८ पोलीस व bsf जवानाचा बंदोबस्त तैनात !
घनसावंगी विधानसभा मतमोजणीसाठी
१७६ तर २१८ पोलीस व bsf जवानाचा
बंदोबस्त तैनात !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने १०० घनसावंगी विधानसभा मतदारसंघातर्गत दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी साठी १७६ अधिकारी कर्मचारी तसेच २१८ पोलीस व bsf चे जवानाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती निवडून निर्णय अधिकारी मनीषा दांडगे यांनी दिली.
घनसावंगी विधानसभा मतमोजणीची प्रक्रिया शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजेगाव रोड घनसावंगी येथे होणार असुन सदर मतमोजणी करिता एकुण २९ टेबलवर पार पडणार आहे. त्यामध्ये १४ टेबलवर EVM व्दारे , १० टेबलवर टपाली मतदान, ०५ टेबलवर ETPBS, ENCORE,अशा प्रकारे मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे.
सदरील मतमोजणीसाठी एक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक , मतमोजणी सहायक ,सुक्ष्म निरीक्षक,व वर्ग ४ चे कर्मचारी असे एकुण ११६ अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त ०६ अधिकारी /कर्मचारी इतर मतमोजणी विषयक कामकाजासाठी नियुक्त आहेत.
सकाळी ८ वाजता टपाली मतदानाची मतमोजणी सुरुवात होणार असुन तसेच EVM व्दारे १४ टेबलवर मतमोजणीच्या एकुण २६ फेऱ्या होणार आहेत.
वरील मतमोणी प्रक्रियाकरिता १३० पोलीस अधिकारी /कर्मचारी २४ राज्य राखीव पोलीस दल , ४० होमगार्ड तसेच स्टाँग रुम करिता २४ BSF चे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. अशी माहिती निवडून निर्णय अधिकारी मनीषा दांडगे, सहाय्यक निवडणूक अधिकारी योगिता खटावकर, विजय चव्हाण यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment