घनसावंगीत चोवीस टेबलवर होणार मतमोजणी

 घनसावंगीत चोवीस टेबलवर

 होणार मतमोजणी 

मतदानाची टक्केवारी वाढली मागील २०१९ च्या विधानसभेला ७३ टक्के यावर्षी ७७


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या निवडणुकीनंतर दिनांक २३ नोव्हेंबर रोजी एकूण चोवीस टेबलवर मतमोजणी होणार आहे. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ७३ टक्के मतदान झाले होते तर या विधानसभेला ७७.६ टक्के मतदान झाले.


  १०० घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी ३५४ मतदान केंद्रावर निवडणूक प्रकिया पार पाडली यात घनसावंगी विधानसभा मतदारसंघात काल एकूण ३ लाख ३० हजार २१९ मतदारांपैकी २ लाख ५४ हजार ८६० मतदारांनी मतदान केले एकूण ७७.१६ टक्के मतदान झाले यात पुरुष १ लाख ३४ हजार ७३९ तर स्त्री लाख २० हजार १२१ यांनी मतदान केले. यासाठी घनसावंगी तालुक्यात १९४, अंबड तालुक्यात १०१ तर जालना तालुक्यांत ५९ असे ३५४ मतदान केंद्र होते.

  दि २३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपासुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथे एकूण २४ टेबलवर, यात पोस्टल १० टेबल व Evm १४ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निरीक्षक राजीव शुक्ला (एस.सी.एस.) यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड मनिषा दांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा योगिता खटावकर, ताहसीलदार अंबड विजय चव्हाण, नायब तहसीलदार संतोष इथापे, नायब तहसीलदार मोनाली सोनवने यांच्या नियंत्रणाखाली पार पाडनार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून स्ट्रॉगरूमला BSF जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!