अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

 जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा

 मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची

 नियुक्ती


 

  जालना जिल्ह्यातील ९९-परतूर, १००-घनसावंगी, १०१-जालना, १०२-बदनापूर(अ.जा.) व १०३-भोकरदन विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४च्या अनुषंगाने बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पाचही विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

        भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले मतमोजणी निरीक्षक दि. २१ नोव्हेंबर रोजी संबंधित विधानसभा मतदारसंघात दाखल होणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने ९९-परतूर विधानसभा मतदारसंघाकरीता श्री.नवीन (भा.प्र.से.), १००-घनसावंगी विधानसभा मतदारसंघाकरीता राजीव शुक्ला (एस.सी.एस.), १०१-जालना विधानसभा मतदारसंघाकरीता भारतीय प्रशासकीय सेवेतील २००८ बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे डॉ. वेद पती मिश्र (भा.प्र.से.), १०२-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाकरीता राजीव रंजन (एस.सी.एस.), १०३-भोकरदन विधानसभा मतदारसंघाकरीता श्रीमती रिचा (एस.सी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. ९९-परतूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबा-परतूर येथील पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय, १००-घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, १०१-जालना विधानसभा मतदारसंघाची जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, १०२-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची बदनापूर येथील कृषि महाविद्यालयात आणि १०३-भोकरदन विधानसभा मतदारसंघाची भोकरदन येथील नगर परिषद मंगल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. असेही कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या