घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात दहा प्रवासी जागीच ठार

 गोंदियात शिवशाही बस उलटून

 भीषण अपघात दहा प्रवासी

 जागीच ठार ;तर पंचवीस 

जण जखमी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


  गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही बसचा आज शुक्रवार रोजी दुर्दैवी अपघात होऊन या भीषण अपघातात जवळपास १० प्रवासी जागीच ठार तर २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती हाती येतेय.


  गोंदिया जिल्ह्यात बस चा भीषण अपघात झाला आहे. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ शिवशाही बस अनियंत्रित झाली, रोडाच्या बाजूला उलटल्याने यात आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २५ च्या जवळ लोक जखमी असुन, जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

   या दुर्घटनेतील प्रवाशांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा असे निर्देश देण्यात आलेत l. नातेवाईकांना संपर्क करता यावा, जखमींना वेळेवर औषध उपचार आणि आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात म्हणून पोलीस, आरोग्य अधिकारी कर्मचारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या