घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अंबड येथील निवृत्त बँक कर्मचारी यांच्या खुनातील आरोपी जेरबंद!

 अंबड येथील निवृत्त बँक

 कर्मचारी यांच्या खुनातील

 आरोपी जेरबंद!

अंबड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी केले जेरबंद...


   दिनांक २१ नोव्हेंबर रोजी फिर्यादी नामे गणेश मच्छिंद्र सपकाळ वय-३५ वर्षे, व्यवसाय-शिक्षक रा. शिराढोण ह.मु. नुतन वसाहत अंबड ता. अंबड जि. जालना यांनी समक्ष पोलीस ठाणे, अंबड येथे हजर येवुन दिलेल्या तक्रारीवरुन दि. २० नोव्हेंबर रोजी त्यांचे वडील नामे मच्छिंद्र गंगाधर सपकाळ वय-६० वर्षे हे मतदान व शेतीच्या कामाकरिता त्यांचे मुळ गावी शिराढोण ता. अंबड जि. जालना येथे गेले असता, ते संध्याकाळी घरी परत न आल्याने फिर्यादी यांनी मोबाईलवरुन संपर्क करुन माहीती घेतली असता, फिर्यादीचे नातेवाईक यांनी फिर्यादीच्या वडिलांचा शोध घेतला असता, ते अंबड ते शिराढोण जाणा-या दक्षिण- उत्तर पाणंद रस्त्याने शिराढोण शिवारामध्ये अंशीराम वाबळे यांच्या शेताचे बाजुला मृत अवस्थेत पडलेले दिसुन आल्याने, दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. अंबड गुरनं 521/2024 कलम 103(1) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

  नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे, अंबड पोलीस निरीक्षक श्री. सतिष जाधव साहेब यांनी आपले अधिनीस्त अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी / अंमलदार यांनी सदर प्रकरणात घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्ह्याच्या तपासाच्या संबंधाने गुन्ह्यातील आरोपी नामे ज्ञानेश्वर दशरथ सपकाळ वय-32 वर्षे रा. शिराढोण ता. अंबड जि. जालना यांस चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने तसेच त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आलेली आहे.

  सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे अधिकारी पो.नि.पंकज जाधव, अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री सतिष जाधव, सपोनि/अमोल गुरले, पोउपनि / राजेंद्र वाघ, पोउपनि / छोटुराम ठुबे, पोउपनि / भगवान नरोडे, पोहेकॉ/विष्णु चव्हाण, दीपक पाटील, सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजणे, पो.अं./ संजय क्षिरसागर, स्वप्निल भिसे, देवा डेहंगळ, अरुन मुंढे,, अक्रूर धांडगे, भागवत खरात, कैलास चेके आदींनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या