पोलीस निरीक्षकाकडे उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे ११६ टक्के रक्कमचे जास्तीचे सापडले घबाड !

 पोलीस निरीक्षकाकडे उत्पन्न

 स्रोतापेक्षा सुमारे ११६ टक्के

 रक्कमचे सापडले घबाड !

 

  तपासात दोन कोटी सात लाख ३१ हजार रुपये असंपदा संपादित केल्याचे झाले उघड 

   बीड चे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता पोलीस निरीक्षकाकडे उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे ११६ टक्के रक्कमचे घबाड सापडले. 

  अपसंपदा रक्कम दोन कोटी सात लाख ३१ हजार पॉईंट झिरो सात. रुपये. म्हणजेच ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे ११६.२८ टक्के जास्त अपसंपदा असल्याचे उघडकीस आलेय.

तक्रारदार शंकर किसनराव शिंदे पोलीस उपअधीक्षक, नेमणुक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी गरअर्जदार हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड. क.(वर्ग १) सध्या निलंबित. रा. विकासवाडी पोस्ट. रेडणी,ता. इंदापूर जि. पुणे. व मनीषा हरिभाऊ खाडे. रा. विकासवाडी पोस्ट. रेडणी,ता .इंदापूर जि.पुणे यांच्याकडे अपसंपदा रक्कम २,०७,३१,३५८.७ रुपये (दोन कोटी सात लाख ३१ हजार पॉईंट झिरो सात रुपये) म्हणजेच ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे ११६.२८ टक्के जास्त असल्याचे उघडकीस आले.

  यांची हकीकत अशी की आरोपी लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड. (वर्ग १ ) रा. विकासवाडी पोस्ट रेडणी. ता.इंदापूर. जि. पुणे यांचे विरुद्ध दिनांक १६/०५/२०२४ रोजी रोजी सापळा कारवाई नंतर पो.स्टे. बीड शहर शहर येथे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.

 लोकसेवक यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे (दि.१०/०८/२०१३ ते दि. १६/०५/२०२४) चे दरम्यान लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड( वर्ग १) यांनी त्यांचे सेवा कालावधीतील परिक्षण कालावधी दरम्यान सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा रुपये २,०७,३१,३५८.०७ रुपये म्हणजेच(११६ टक्के) रकमेची अपसंपदा संपादित केली आहे.

   एकूण अपसंपदे पैकी हरिभाऊ नारायण खाडे यांची पत्नी सौ. मनीषा हरिभाऊ खाडे यांनी सुमारे ६२,७९,९५३ ( ६२ लाख ७९ हजार ९५३ रुपयाची) मालमत्ता स्वतःच्या नावे धारण करून लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे यांना अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे (प्रोत्साहन दिल्याचे ) उघड चौकशीत निष्पन्न झाले म्हणून लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड,(वर्ग १) सध्या. निलंबित यांचे विरुद्ध कलम १३ (१)(ब) व ,१३ (२)भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ व लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे यांना हेतूपुरस्सर व बेकायदेशीरपणे अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन ,२०१८) चे कलम १२ प्रमाणे आरोपी लोकसेवक हरिभाऊ नारायण खाडे व त्यांची पत्नी सौ मनीषा हरिभाऊ खाडे यांचे विरुद्ध पो.स्टे. बीडशहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  सदरील कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, चौकशी अधिकारी शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक , ला.प्र.वि. बीड, तपास अधिकारी किरण बगाटे पोलीस निरीक्षक ला. प्र.वी. बीड यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!