"साखर उद्योग हा पैसे कमवण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आहे." – डॉ. हीकमत दादा उढाण
"साखर उद्योग हा पैसे कमवण्यासाठी
नाही, तर शेतकऱ्यांचा स्वाभिमान
जागृत करण्यासाठी आहे."
– डॉ. हीकमत दादा उढाण
सरळपणा आणि प्रामाणिकपणा म्हणजे हिकमत दादा
आपल्या साखर उद्योगाबद्दल ठाम भूमिका मांडत शेतकऱ्यांच्या हिताचे वचन दिले आहे. "माझा साखर उद्योग हा पैसे कमावण्यासाठी किंवा धंदा करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आहे," असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना डॉ हिकमत दादा उढाण यांनी साद घातली आहे.
डॉ हिकमत उढाण यांनी आपले मनोगत व्यक्त मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते विकास आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "माझा साखर उद्योग हा पैसे कमवण्यासाठी किंवा धंदा करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आहे."
डॉ. उढाण यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघातील गोदाकाठ रस्त्यांचे जाळे निर्माण करन "पुढील पाच वर्षांत आपल्या गावा-गावातील रस्ते करण्यामध्ये माझा पाच वर्षांचा कालावधी निघून जाईल, आणि हे रस्त्यांचे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करीन," असे ते म्हणाले.त्यांनी सुखापुरी फाटा ते तीर्थपुरी कुंभार पिंपळगाव रस्ता देखील काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. हिकमत दादांनी स्पष्ट केले की, आपल्या साखर उद्योगात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देण्याचे आश्वासन देताना ते म्हणाले, "आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ऊसाशिवाय बाहेरील ऊस माझ्या कारखान्यात गाळप केला जाणार नाही. प्रथम प्राधान्य आपल्या मतदार संघाचतील शेतकऱ्यांनाच असेल. त्यामुळे "ऊसाच्या राजकारणाला बळी पडू नका," आपला स्वाभिमान जागृत ठेवन्यायासाठी आपल्या हक्कांसाठी उभे रहा." असे आवाहन केले. या ठाम भूमिकेने डॉ. हिकमत दादा शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे, आणि मतदारसंघातील शेतकरी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत.
घनसावंगी मतदारसंघातील जनता गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांपलीकडे काहीही मिळालं नसल्यामुळे मुलभूत समस्या सोडवण्यासाठी संधी द्या असे आवाहन डॉ हिकमत उढाण यांनी केले आहे.
हिकमत दादा हे कधीही खोटं न बोलणारे, जमिनीवर राहणारे, सामान्य जनतेशी नातं जपणारे आणि सहज उपलब्ध असणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी मतदारसंघातील समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.
हिकमत दादा यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा सरळपणा आणि प्रामाणिकपणा. ते नेहमीच सत्य बोलतात, प्रसंगी ती कडू असली तरीही. त्यांच्या या गुणामुळेच ते सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी आता हिकमत दादा यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याला संधी दिली जाणे गरजेचे आहे, असे मत स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment