आयुष्यात "कधीही खोटं बोललो नाही " कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला लावली नाही - डॉ. हिकमत दादा
आयुष्यात "कधीही खोटं बोललो नाही "
कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन
शपथ घ्यायला लावली नाही -
डॉ. हिकमत दादा
डॉ. हिकमत दादा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सत्यनिष्ठेची आणि प्रामाणिकपणाची जाहीरपणे ग्वाही दिली. एका आजीला भेटल्या नंतर ते म्हणाले, "आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि परिवाराने दिलेल्या उत्तम संस्कारांमुळे मला कधीच ज्वारी हातात धरून शपथ घ्यावी लागली नाही."
त्यांनी स्पष्ट केलं की, "मी कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला लावली नाही, आणि भविष्यातही असं करणार नाही." या वक्तव्याने त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर असलेला ठाम विश्वास व्यक्त केला.
"आपल्या थोरामोठ्यांचं निखळ प्रेम आणि असीम विश्वास हेच माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे," असंही ते म्हणाले.
डॉ. हिकमत दादा यांनी आपल्या घनसावंगी मतदारसंघातील सर्व कुटुंबांचा स्वाभिमान जपण्याचं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याचं वचन दिलं. त्यांच्या नेतृत्वाने मतदारसंघातील लोकांचा विश्वास जिंकण्यास मोठं योगदान दिलं असून, या वक्तव्यानंतर मतदारसंघात त्यांच्या निष्ठेचं प्रतिबिंब अधिक दृढ झालं आहे.
डॉ. हिकमत दादा यांचे हे विधान त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये आपुलकी निर्माण करतं. आपल्या मतदारसंघाचा स्वाभिमान टिकवणं, वाढवणं आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
यामुळे मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाबद्दलचा आदर आणि विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment