घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा रात्री निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही.
काल दि २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शिरढोण येथे सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा खून केला असल्याची घटना उघडकीस आलीय.
शिरढोण कडून अंबड कडे येणाऱ्या अंबड शहरातील नूतन वसाहत येथील रहिवाशी तथा पीपल्स बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी मच्छिंद्र गंगाधर सपकाळ यांचा काल रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने अज्ञात कारणास चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केलाय अशी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, अंबड ठाणेदार सतीश जाधव, पीएसआय गुरले व अन्य सहकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलीय. सपकाळ यांचा मृतदेह खाजगी वाहनातून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अंबड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खुणाचा तपासाची प्रक्रिया चालू झाली आहे . यांचा खून कोणी केलाय, कशामुळे केलाय याचे करण मात्र अस्पष्ट असू. तपासण्याचे पोलिसांकडे मोठे आव्हान आहे.
Comments
Post a Comment