घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालन्यात रूग्णवाहीका पलटी होऊन त्यातील आठ वर्षीय बालक जागीच ठार तर आजी गंभीर झाल्याची घटना घडलीय.
मंठयापासून एक किलोमीटर अंतरावर मंठा जे जालना या राज्य मार्गावर रस्त्याच्या खाली खड्ड्यात रूग्णवाहीका पलटी होऊन जयराज पुंडलिक कडके ( रा श्रीकृष्ण नगर, छत्रपती संभाजीनगर )या आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर मुलाची आजी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की २० नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ॲम्बुलन्स चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात मयत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सदर गाडी रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये पलटी झाली असल्याने या अपघातात जयराज कडके या आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर निर्मला महादेव कडके या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या पथकाकडून भेट दिली.
Comments
Post a Comment