घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

महायुतीचे हात बळकट करण्यासाठी बदल घडवा - डॉ हीकमतदादा उढाण

 घनसावंगी मतदार संघात विकासात्मक

 बदल घडवण्यासाठी व महायुतीचे हात

 बळकट करण्यासाठी बदल घडवा - 

डॉ हीकमतदादा उढाण 

   राज्यातील महिलांच्या आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ या योजनांच्या माध्यमातून महिलांना आणि तरुणांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि घनसावंगी मतदार संघात विकासात्मक बदल घडवण्यासाठी धनुष्यबाण निवडा असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ हीकमतदादा उढाण यांनी १६ नोव्हेंबर रोजी केले.


  भाटेपुरी सर्कल मधील दुधना काळेगाव, रेवगाव, पाचनवडगाव, पुणेगाव, हिस्वण खु, हिस्वण बु, थेरगाव, खणेपुरी, वानडगाव, कचरेवाडी, बेथलम आदी गावात हीकमतदादा उढाण यांनी भेटी दिल्या 

   यावेळी बोलतांना डॉ हिकमत उढाण म्हणले की "लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना म्हणजे केवळ महिलांच्याच नव्हे, तर तरुणांच्या सक्षमीकरणाचं मोठं पाऊल आहे.

 या योजनांच्या माध्यमातून आम्ही राज्यातील महिलांना व तरुणांना आर्थिक स्थिरता आणि सामाजिक सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत."


  महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे राज्यातील महिलांबरोबरच तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे, आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास या योजना मोलाचे योगदान देतील. यावेळी महायुतीचे हात बळकट करण्यासाठी मतदार संघात बदल घडवा व शिवसेनेच्या धनुष्यबाणला मतदान करा असे आवाहन केले.



शिवसेनेत प्रवेशाची इनकमिंग सुरुच...

  घनसावंगी मतदार संघात शिवसेनेत प्रवेशाची मोठी इनकमिंग सुरु असून डॉ हिकमत दादा उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत यात युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख दत्ता बेद्रे, तिर्थपुरी, बाचेगाव, मुरमा, रामसगाव, शेवता, कोठाळा, वडीवाडी तांडा, निपाणी पोखरी, खोडेपूरी, डोमलगाव, मासेगाव, भारडी, भाटेपुरी, जाबंसमर्थ, माळी पिपंळगाव आदी गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


अखिल भारतीय कैकाडी महासंघाचा जाहीर पाठिबा..

  १०० घनसावंगी विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार उढाण हिकमत बळीराम यांना अखिल भारतीय कैकाडी महासंघानी आज जाहीर पाठींबा दिला आहे



रांजणी, तीर्थपुरी सर्कल मधे गाठी भेटी..

  महायुतीचे अधिकृत उमेदवार हिकमत बळीराम उढान यांच्या प्रचारार्थ रांजणी सर्कल मधील गावात

    जि प उपाध्यक्ष महेंद्र पवार, जि प सदस्य जयमंगल जाधव, शिवसंग्राम चे प्रवक्ते लक्ष्मण नवले, डॉ वरखडे, डॉ कीशोर, भास्कर वराडे, खालेद भाई आदीसह कल्याणीताई गजानन तौर यांनी बोडखा, खडका, पिंपरखेड, घुले पाडुळी, अंतरवाली टेंभी, मुरमा, तीर्थपुरी, सुखापुरी आदी गावात भेटी देऊन हिकमतदादा उढान यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या