तीर्थपुरीत चोरट्यांचा दोन ठिकाणी डल्ला मारून १ लाख ३० हजाराचा ऐवज केला लंपास
पोलीस निवडणूक कामात चोरटे जोमात !
तीर्थपुरीत चोरट्यांचा दोन
ठिकाणी डल्ला १ लाख ३०
हजाराचा ऐवज केला लंपास
एकीकडे महसूल विभाग व पोलीस विभाग निवडणूक कामात असताना दुसरीकडे चोरटे मात्र जोमात असल्याचे दिसून आलंय कान घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे चोरट्याने दोन ठिकाणी डल्ला मारून एक लाख तीस हजाराचा ऐवज लंपास केलाय. याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात गोरख नामदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की रा काल दि २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी १० वाजेच्या सुमारास मी व माझी पत्नी आईवडील असे जेवन करुन घराचा दरवाजा उघडा ठेवुन घरात झोपी गेलो होते
आज २१ नोव्हेंबर सकाळी सहा वाजेच्या सुमारास झोपेतून उवलो त्यावेळी माझी आई सविता जाधव ही मला म्हणाली की आपल्या घरातील लोखंडी संदूक घरासमोर असलेल्या मारवत्वाच्या शेतात पडलेला दिसत आहे व त्यातील सामान अस्थाव्यस्त झालेले आहे त्यामुळे आम्ही सदर ठिकाणी गेलो व पाहीले असता सदर संदुक आमचाच होता त्यामधील नगदी रुपये व सोन्याचे दागीने चोरी गेल्याचे विसल्याने आम्ही शोध घेत असतांना समजले की साबळा मारोती गुजाळ रा. तिर्थपुरी ता. घनसावंगी जि. जालना यांचे पण नगदी रुपये व सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलें आहे.
यात गोरख जाधव यांचे नगदी ३० हजार रुपये, ४० हजाराचे झुंबर, दोन काळ्या मन्याची पोत, व ज्यामध्ये सोन्याचे मणी व पत्ता, सावळा मारोती गुंजाळ याचे नगदी ४० हजार रुपये, २० हजार रुपयांचे सोन्याचे झुंबर, एक काळ्या मन्याची पोत, व ज्यामध्ये सोन्याचे मणी व पत्ता असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय. याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment