Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी-अनैतिक संबंधाच्या संशयावरून विवाहितेचा खून !

Image
  पती संशयाच्या भोवऱ्यात:चारित्र्याबाबत संशय घेऊन घातक हत्याराने केले वार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव येथे एका पतीने खोट्या संशयातून आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिस ठाणे घनसावंगी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  फिर्यादी वसंत बाबुराव सुतार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृत विवाहिता (वय 31, रा. मंगुजळगाव) हिचा पती कांता दगडू गुढेकर याने तिच्यावर चारित्र्याबाबत संशय घेऊन तिच्या छातीवर कोणत्यातरी घातक हत्याराने वार करून तीचा खून केला आहे.    घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक केतन राठोड, पोउपनि काळे, पोउपनि पवार यांनी भेट दिली.

जालना नूतन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांची कामगीरी

Image
  जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी श्रीमती आशिमा मित्तल यांची नियुक्ती; नाशिक जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्याचा ठसा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        श्रीमती आशिमा मित्तल यांनी शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. याआधी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक येथे कार्यरत असताना त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः शिक्षण आणि बालविकास यामध्ये अनेक स्तुत्य उपक्रमांची अंमलबजावणी करून आपली प्रशासकीय कार्यक्षमता सिद्ध केली आहे.       श्रीमती मित्तल या मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असून त्यांनी आयआयटी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केली आहे. या अभ्यासक्रमात त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्यांनी नंतर मानववंशशास्त्र (Anthropology) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.      सन 2017 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण करत देशात 12 वा क्रमांक पटकावणाऱ्या श्रीमत...

बीड महादेव मुंढे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू न्यायाची याचना करत आहेत! बैठकीत अश्रू अनावर

Image
अन्यायाविरुद्धच्या लढ्याला नवी दिशा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        स्व. महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या होऊन तब्बल २१ महिने उलटून गेले, पण आजतागायत एका ही आरोपीला अटक झाली नाही, ही न्यायसंस्थेच्या आणि पोलिस यंत्रणेच्या गंभीर अपयशाची साक्ष ठरत आहे. या अन्यायाविरुद्ध न्यायाची याचना करत महादेव मुंडे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू आज संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख करत आहेत.       आज १ ऑगस्ट रोजी बीड येथे सर्वपक्षीय, सर्वधर्मीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्व. महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.     मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय भावनिक शब्दांत व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. "मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदासाठी सह्याद्रीवरून वर्षा आणि वर्षावरून सह्याद्री करत येडे मारीत फिरणारे कुठे होते जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली?" असा रोषपूर्ण सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नि...

रमी खेळ झाला डोईजड! अखेर माणिकराव कोकाटेंना कृषी खात्यापासून हटवलं; दत्ता भरणे नवे कृषी मंत्री

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे खातेफेर झाले असून, कृषी खात्याची जबाबदारी अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. कोकाटे यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती देण्यात आली आहेत.      सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ नुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार ही महत्त्वाची सुधारणा मनिर्धा वर्मा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केली. खात्यांच्या फेरबदलाची अधिकृत अधिसूचना     सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१ अन्वये अधिसूचनेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत: 1. नोंद क्रमांक २२ — श्री. दत्तात्रय भरणे यांच्याजवळील "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औका...

केलेल्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे कंत्राटदारांने जीवन संपवले

Image
थकीत बिले, तोकडी आश्वासने आणि शासनाची उदासीनता- गुत्तेदारानो सावधान ! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. हर्षल पाटील या तरुण, उत्साही अभियंता कंत्राटदाराने शासनाच्या दुर्लक्षित धोरणांना आणि आर्थिक संकटाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आलीय. त्यांचे वय अवघे ३० च्या आसपास. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले होते. मात्र, महिनोनमहिने बिले थकवून ठेवणाऱ्या यंत्रणेने त्यांना अंतर्गतरीत्या पोखरून टाकले. असा आरोप होत आहे.      हर्षल यांनी या प्रकल्पासाठी ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. काम पूर्ण करूनही शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जाची परतफेड शक्य झाली नाही. दिवसेंदिवस व्याजाचा बोजा वाढत गेला, त्यात अधिकाऱ्यांकडून मिळणारी टाळाटाळ, अपमानास्पद वागणूक आणि आर्थिक तणाव यामुळे ते तणावाखाली गेले. अनेक प्रयत्न, हेलपाटे, अर्जविनंत्या केल्यानंतरही बिले मंजूर झाली नाहीत. या सगळ्या परिस्थितीने हर्षलला नैराश्याच्या...

घनसावंगी - भीषण चोरी: वीस लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Image
ज्वेलर्स दुकान फोडून अज्ञात चार चोरटे पसार  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठी चोरी घडली. कुंभार पिंपळगाव येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक ज्ञानेश्वर ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चार चोरट्यांनी तब्बल ₹१९, ७६,५००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.   घटनेचा तपशील      ही घटना दि. २३ जुलै २०२५ रोजी पहाटे ३:४२ ते ४ या वेळेत घडली असे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांनी पूर्ण तयारीसह शटरचे कुलूप आणि चॅनल गेट फोडून दुकानात प्रवेश केला. काउंटरमधील ड्रम व लॉक फोडून विविध प्लास्टिकच्या बॉक्स व डब्यांमधील मौल्यवान दागिने लंपास करण्यात आले.      फिर्यादी ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे.  या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 392/2025 अन्वये कलम 331(4), 305(अ) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्य...

बीड पुन्हा हादरले! प्रेमसंबंधातून तरुणाचा मारहाणीत मृत्यू

Image
अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा अमानुष मारहाणीत मृत्यू गेवराई तालुक्यातील गंगावाडीतील हृदयद्रावक घटना – पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, खुनाचा गुन्हा वाढवण्याची शक्यता वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रेमसंबंधामुळे एका तरुणाचा जीव गमावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे एका अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा काही नातेवाईकांनी अमानुष मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवम चिकणे याचा मृत्यू – प्रेमसंबंध ठरले घातक     शिवम काशिनाथ चिकणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो माजलगाव येथे अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याचे आपल्या गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. मात्र यावेळी अचानक तिचे नातेवाईक घरी पोहोचले. त्यावेळी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली. रस्त्यात गाठून अमानुष मारहाण     विवादानंतर संतप्त नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठले व लाठ्य...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या