अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी-अनैतिक संबंधाच्या संशयावरून विवाहितेचा खून !

 पती संशयाच्या भोवऱ्यात:चारित्र्याबाबत संशय घेऊन घातक हत्याराने केले वार


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव येथे एका पतीने खोट्या संशयातून आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिस ठाणे घनसावंगी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वसंत बाबुराव सुतार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृत विवाहिता (वय 31, रा. मंगुजळगाव) हिचा पती कांता दगडू गुढेकर याने तिच्यावर चारित्र्याबाबत संशय घेऊन तिच्या छातीवर कोणत्यातरी घातक हत्याराने वार करून तीचा खून केला आहे.

   घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक केतन राठोड, पोउपनि काळे, पोउपनि पवार यांनी भेट दिली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या