घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

बीड महादेव मुंढे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू न्यायाची याचना करत आहेत! बैठकीत अश्रू अनावर

अन्यायाविरुद्धच्या लढ्याला नवी दिशा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      स्व. महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या होऊन तब्बल २१ महिने उलटून गेले, पण आजतागायत एका ही आरोपीला अटक झाली नाही, ही न्यायसंस्थेच्या आणि पोलिस यंत्रणेच्या गंभीर अपयशाची साक्ष ठरत आहे. या अन्यायाविरुद्ध न्यायाची याचना करत महादेव मुंडे कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू आज संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख करत आहेत.

      आज १ ऑगस्ट रोजी बीड येथे सर्वपक्षीय, सर्वधर्मीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्व. महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

    मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय भावनिक शब्दांत व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. "मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदासाठी सह्याद्रीवरून वर्षा आणि वर्षावरून सह्याद्री करत येडे मारीत फिरणारे कुठे होते जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली?" असा रोषपूर्ण सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर कठोर टीका केली.

    तसंच, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांचा उल्लेख करत, “त्या अजूनही न्यायासाठी दारं ठोठावत आहेत. पण त्या एकट्या नाहीत – हा लढा त्यांच्या कुटुंबाचा नाही, हा लढा आपल्या सर्वांचा आहे!” अशी भावनिक हाक त्यांनी उपस्थितांना आणि संपूर्ण जनतेला दिली.

    बैठकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, "कुणाचीही मालमत्ता लुटली नाही, कुणावर जबरदस्ती केली नाही, पण अजूनही न्याय मिळत नसेल तर लोकांमध्ये असंतोष उफाळून येणारच." ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना उद्देशून दिलेल्या इशाऱ्यांमध्ये सांगण्यात आलं की, "लोक जर कायदा हातात घेतला तर तुम्ही रस्त्यावर थांबू शकणार नाही, हे लक्षात ठेवा."

    महादेव मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांची काळजी त्यांचे वृद्ध आई-वडील आणि पत्नी घेत आहेत. "रात्री अपरात्री काम करताना त्यांनी आपल्या लेकरांना वेळ दिला नाही, कारण त्यांना घराचा गाडा हाकायचा होता. पण आज त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय." अशी हळहळ व्यक्त झाली.

    या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परळी येथील लाभार्थींच्या समस्या एका महिन्यात १०० टक्के सोडवल्या जातील, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, हीच तत्परता न्याय मिळवण्यासाठी का दाखवली जात नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

   या संपूर्ण घटनाक्रमावरून हे स्पष्ट होतं की, आता हा लढा केवळ एका कुटुंबाच्या न्यायासाठी नाही – हा लढा व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्धचा आहे. आणि हा लढा संपूर्ण समाजाने एकजुटीने आणि ठामपणे लढला पाहिजे, अशी ठाम भूमिका या बैठकीतून पुढे आली.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या