Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय:आता शेतरस्ते किमान ३ ते ४ मीटर रुंद असणार –७/१२ उताऱ्यात होणार कायदेशीर नोंद

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतीच्या गरजा लक्षात घेऊन एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने "जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ" या शासन निर्णयाद्वारे शेतरस्ते उपलब्ध करून देण्यासंबंधी आणि त्यांच्या कायदेशीर नोंदीसंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत. शेतीतील यांत्रिकीकरण आणि त्याचे परिणाम       पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांच्या सहाय्याने केली जात होती. मात्र, आजच्या आधुनिक काळात ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारख्या अवजारे वापरात येत आहेत. यामुळे पारंपरिक अरुंद पायवाटी अपुऱ्या ठरत आहेत आणि आधुनिक शेतीला अडथळा येत आहे. शेतकऱ्यांसाठी ठळक निर्णय 1. शेतरस्त्यांची किमान रुंदी ३ ते ४ मीटर असावी    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ नुसार, शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामुग्री सहज वापरता यावी यासाठी शेतरस्ते किमान ३ ते ४ मीटर रुंद असावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. 2. ७/१२ उताऱ्यावर शेतरस्त्यांची नोंद बंधनकारक   ...

घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा कहर: पिके पाण्याखाली भयानक छायाचित्रे

Image
  वाऱ्यामुळे पिके आडवी: शेताला आले तळ्याचे स्वरूप- भयावह परिस्थिती  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यात काल (२१ मे) रात्री वादळी वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. तीर्थपुरी व परिसरातील मुरमा, कंडारी, अंतरवाली टेंभी, खलापुरी, खाडका, लिंबोणी, रामसगाव, जोगलादेवी, शेवता, लिंगसेवाडी, बानेगव, भोगावं, मंगरुळ, कोठी, मुद्रेगाव, दहिगव्हण, भायगव्हाण, एकरुखा, राहेरा, तनवाडी, खापरदेव हिवरा, दैठना, भणंग जळगाव, एकलहरा सह तालुक्यातील गावांमध्ये मुसळधार पावसाने आणि वाऱ्याच्या तडाख्याने शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.      वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, घरांची पत्रे उडून गेली, वीज पुरवठा खंडित झाला, ओढे-नाले ओव्हरफ्लो झाले. काही भागांत वीज कोसळल्याने जनावरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. परिणामी अनेक रस्ते अडगळीने बंद झाले आणि गावांमधील संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण झाली.      शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. ऊस, बाजरी, मका, डाळिंब, केळी, मोसंबी या नगदी पिकांचे मो...

घनसावंगी तालुक्यात भरदिवसा तीन गावांत घरफोडीचा धुमाकूळ - साडे आठ लाखाचा ऐवज लंपास !

Image
  मुरमा, मच्छिंद्रनाथ चिंचोली, पडोळी तीन गावांत घरफोडी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        घनसावंगी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गडद होत आहे. अवघ्या दोन दिवसांत पाडूळी खुर्द, मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि मुरमा या तीन गावांमध्ये भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनांनी परिसरात खळबळ उडवून दिली आहे. या तिन्ही घटनांमध्ये एकूण जवळपास साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. पाडूळी खुर्द: चाकूचा धाक दाखवत ३१ हजारांची रोकड लंपास     २१ मे रोजी दुपारी पाडूळी खुर्द येथे संभाजी नाईक यांच्या घरी घडलेल्या घटनेत वैष्णवी नाईक या घरात एकट्या होत्या. दोन चोरट्यांनी लाकडी टॉमीने दरवाजा तोडून प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवत ३१,००० रुपयांची रोकड लंपास केली. वैष्णवी नाईक यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्रनाथ चिंचोली: शेतात गेलेल्या कुटुंबाच्या घरातून साडेतीन लाखांची चोरी      त्याच दिवशी म...

जालना जिल्ह्यात वादळ, वीज आणि पावसाचा यलो अलर्ट

Image
  जालना जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना दक्षतेचे आवाहन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 22 मे ते 26 मे 2025 या कालावधीत वादळ, विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.     22 व 23 मे 2025 रोजी जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मे 2025 दरम्यानही अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.     या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे: 1. वादळी वारे व विजेच्या वेळेस झाडाखाली थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका. 2. विजेच्या वेळेस विद्युत ...

घनसावंगी- चाकूचा धाक दाखवत भरदिवसा ३१ हजारांची रोकड लंपास ! दोन ठिकाणी चोरीच्या घटना

Image
घरफोडीचा चोरट्यांकडून धुमाकूळ  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     घनसावंगी तालुक्यात बुधवारी चोरट्यांनी भरदिवसा दोन वेगवेगळ्या गावांमध्ये घरफोडीच्या घटना घडवून घनसावंगी परिसरात दहशत निर्माण केली.  पाडूळी खुर्द आणि मच्छिंद्रनाथ चिंचोली या गावांमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडूळी खुर्दमध्ये चाकूचा धाक दाखवत ३१ हजारांची रोकड चोरी      पाडूळी खुर्द येथील रहिवासी संभाजी नाईक यांच्या घरी ही घटना दुपारी साधारण 2.30 वाजता घडली. त्या वेळी त्यांच्या पत्नी वैष्णवी नाईक (वय 21) या घरात एकट्या होत्या. त्या विश्रांती घेत असतानाच दोन अज्ञात चोरट्यांनी टॉमीच्या सहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम मागितली. वैष्णवी नाईक घाबरून दुसऱ्या खोलीत पळून गेल्या आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले.     दरम्यान, चोरट्यांनी पलंगाच्या गादीखाली आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली एकूण ३१,000/- रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. यामध्ये ५००, २००, ...

श्रेयवादावर निसर्गाचा पडदा: घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाने गोदावरीला तूर्तास जीवनदान परंतु शेती व जनावरांचे नुकसान

Image
  गोदावरी नदीत पाणी सोडण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले.. पाणी नदीत पोहोचण्या आधीच निसर्गाने ते हिरावून घेतले ? वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     अंबड घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीत पाणी सोडण्याच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची चुरस रंगली होती. सोशल मीडियावर पाण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत पोस्टांच्या फैरी झडत होत्या. मात्र, नियोजित पाणी नदीत पोहोचण्याआधीच निसर्गाने स्वतः हस्तक्षेप करत, अवकाळी व जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला भरभरून पाणी दिले. यामुळे राजकीय श्रेयवादावर निसर्गानेच पडदा टाकल्याचे चित्र तयार झाले आहे.     मागील आठवड्यापासून तालुक्यात अनेक भागांत मुसळधार अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. परिणामी गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी आपली इलेक्ट्रिक मोटारी, पंपसेट्स, व शेतीसाठी आवश्यक साहित्य पाण्यापासून वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. विजेचा तडाखा, जनावरांचा मृत्यू काही भागांत वीज कोसळून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आ...

घनसावंगी - शेतवस्तीवर भीषण चोरी व पती-पत्नीवर अमानुष हल्ला: पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

Image
  २० दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील एका शेतवस्तीवर ३ मे रोजी रात्री सुमारास घडलेल्या भीषण चोरी व पती-पत्नीवर अमानुष हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय बिबनभाई बापूजी पठाण यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांनी आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.       ही घटना १ मेच्या मध्यरात्री घडली. बिबनभाई पठाण आणि त्यांची पत्नी सलीमाबी पठाण हे खापरदेव हिवरा-सिद्धेश्वर पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात वस्ती करून राहत होते. त्या रात्री सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश करून त्यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. चोरट्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, सलीमाबी पठाण यांच्या हातावरील तीन बोटे धारदार शस्त्राने तोडल्याने परिसरात खळबळ उडाली.  ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या