अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी - शेतवस्तीवर भीषण चोरी व पती-पत्नीवर अमानुष हल्ला: पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

 २० दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील एका शेतवस्तीवर ३ मे रोजी रात्री सुमारास घडलेल्या भीषण चोरी व पती-पत्नीवर अमानुष हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय बिबनभाई बापूजी पठाण यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांनी आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

      ही घटना १ मेच्या मध्यरात्री घडली. बिबनभाई पठाण आणि त्यांची पत्नी सलीमाबी पठाण हे खापरदेव हिवरा-सिद्धेश्वर पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात वस्ती करून राहत होते. त्या रात्री सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश करून त्यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. चोरट्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, सलीमाबी पठाण यांच्या हातावरील तीन बोटे धारदार शस्त्राने तोडल्याने परिसरात खळबळ उडाली.

    हल्लेखोरांनी गळ्यातील व कानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि अंदाजे एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. हल्ल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळले. सकाळी नऊ वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तत्काळ घनसावंगी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, त्यानंतर बिबनभाई पठाण यांना गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

   या सदरील घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, याचा तपास पोलिसांना लागला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल संतापाची लाट उसळली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या