घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
22 व 23 मे 2025 रोजी जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मे 2025 दरम्यानही अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
1. वादळी वारे व विजेच्या वेळेस झाडाखाली थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.
2. विजेच्या वेळेस विद्युत उपकरणे वापरणे टाळा, तसेच ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल यापासून दूर राहा.
3. मोकळ्या जागा, विद्युत खांब, धातूची कुंपणं, टॉवर्स यापासून दूर राहा.
4. जर मोकळ्या जागेत असाल, तर गुडघ्यावर बसून कान झाका व डोके गुडघ्यात ठेवा, जमिनीशी संपर्क कमी ठेवा.
5. शेतकरी बांधवांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
6. बाजार समितीत माल आणताना नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.
7. जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
नागरिकांनी व जनावरांनी वादळी वाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करावा आणि आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष 02482-223132 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 तसेच स्थानिक तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन गणेश महाडीक, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.
Comments
Post a Comment