घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
२१ मे रोजी दुपारी पाडूळी खुर्द येथे संभाजी नाईक यांच्या घरी घडलेल्या घटनेत वैष्णवी नाईक या घरात एकट्या होत्या. दोन चोरट्यांनी लाकडी टॉमीने दरवाजा तोडून प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवत ३१,००० रुपयांची रोकड लंपास केली. वैष्णवी नाईक यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे परमेश्वर तेलंग यांचे कुटुंब शेतात असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५०,००० रुपये रोख व तीन तोळे सोनं असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना दुपारी २ ते ३ च्या सुमारास घडली असून, सायंकाळी कुटुंब घरी परतल्यावर प्रकार उघडकीस आला.
२२ मे रोजी गुरुवारी दुपारी मुरमा गावात विक्रम शिवाजी गपाट व विकास शिवाजी गपाट यांच्या घरी अज्ञात तिघा चोरट्यांनी धाडसी चोरी केली. गपाट कुटुंबीय बाहेरगावी असताना चोरट्यांनी घराची रेकी करून कुलूप तोडले आणि पाच ते साडेपाच लाखांचा ऐवज, ज्यात रोख रक्कम व सोनं-चांदीचे दागिने होते, असा ऐवज लंपास केला अशी माहिती मिळाली. चोरटे दुचाकीवरून आले होते व घरात कोणी नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी बेधडक प्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिघे अज्ञात चोरटे दुचाकीवरून मुरमा येथे आले. त्यांनी थेट विक्रम शिवाजी गपाट व विकास शिवाजी गपाट यांच्या घरासमोर दुचाकी उभी करून घराची रेकी केली. शेजारील एका मुलीकडून घरात कोणीही नसल्याची माहिती मिळाल्यानंतर, चोरट्यांनी निर्धास्तपणे घरात प्रवेश करून चोरी केली. या वेळी शिवाजी गापट आठवडी बाजारासाठी तीर्थपुरीला गेले होते, तर विक्रम व विकास गपाट हे नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी होते. त्यांच्या अनुपस्थितीतच ही धाडसी चोरी करण्यात आली.
विशेष म्हणजे, तीर्थपुरी येथे पोलीस ठाणे स्थापन झाल्यापासून परिसरात अवैध धंदे फोफावले असून चोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवर कोणताही वचक राहिलेला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. पोलीस ठाण्याचे अस्तित्व फक्त नावापुरतेच राहिले आहे व पोलिस ठाण्याची भूमिका केवळ शोभेपुरती उरल्याची भावना आता चोरी झालेल्या गावातील ग्रामस्थांमध्ये बळावत आहे. घटनास्थळी तीर्थपुरी पोलिसांनी भेट दिली असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
नागरिकांची मागणी – कडक कारवाई करा
सततच्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
Comments
Post a Comment