घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
पाडूळी खुर्द येथील रहिवासी संभाजी नाईक यांच्या घरी ही घटना दुपारी साधारण 2.30 वाजता घडली. त्या वेळी त्यांच्या पत्नी वैष्णवी नाईक (वय 21) या घरात एकट्या होत्या. त्या विश्रांती घेत असतानाच दोन अज्ञात चोरट्यांनी टॉमीच्या सहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम मागितली. वैष्णवी नाईक घाबरून दुसऱ्या खोलीत पळून गेल्या आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले.
दरम्यान, चोरट्यांनी पलंगाच्या गादीखाली आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली एकूण ३१,000/- रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. यामध्ये ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.
याच दिवशी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील प्रमोद तेलंग यांच्या घरी देखील चोरीची घटना घडल्याचे समजते. घरात शिरण्याची पद्धत, भरदिवसा चोरी केल्याच्या घटनांमुळे हे चोरटे एकाच टोळीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणी घनसावंगी पोलीस स्टेशन येथे सायंकाळी वैष्णवी नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी व गुन्हेगारांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. भरदिवसा, घरात महिला एकट्या असताना चोरट्यांचा असा मुक्त संचार होणे ही चिंतेची बाब असून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून गुन्हेगारांना गजाआड करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Post a Comment