Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अशीही जिल्हा परिषदेची शाळा: पहिलीपासून इंग्रजी-मराठी वाचन, शिक्षक स्वतःच्या खर्चातून देतात बक्षिसे

Image
  पण वर्गखोल्यांचे प्लास्टर मात्र कधीही कोसळण्याच्या स्थितीत! ऑन दी स्पॉट ग्राउंड रिपोर्ट बाचेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        देशभरात शिक्षण क्षेत्रात खासगी इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढत चालला असतानाच ग्रामीण भागात काही जिल्हा परिषद शाळा आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे त्याचं जिवंत उदाहरण ठरतं. याबरोबरच घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण, मासेगाव, चित्रवडगाव, कंडारी परतूर, साकळगाव या शाळेतही चांगली गुणवत्ता आहे. अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.     ही शाळा शिक्षणात नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक व नैतिक विकासात अग्रेसर आहे. सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १५४ विद्यार्थी (७३ मुले आणि ८२ मुली) शिक्षण घेत आहेत. विशेष बाब म्हणजे पहिलीपासूनच विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी आणि मराठी वाचन करतात, जे विशेषतः ग्रामीण भागात फारच दुर्मिळ चित्र आहे. शिक्षकांचा ‘स्वखर्ची’ शिक्षणमंत्र: गुणवंतांना मिळतं प्रोत्साह...

प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात शोककळा पसरली आहे.       डॉ. वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले होते. त्यांचं रुग्णालय हे अनेकांसाठी आशेचं ठिकाण ठरत होतं. मात्र, हेच रुग्णालय त्यांच्या शेवटच्या श्वासाचं साक्षीदार ठरलं, ही बाब अधिकच वेदनादायक ठरते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.      घटनेनंतर रुग्णालयातील महिला आणि पुरुष कर्मचारी यांचे अश्रू थांबत नव्हते. अनेकांना ही बातमी विश्वास बसणारी नव्हती. वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, रुग्ण, नातेवाईक आणि चाहत्यांमध्ये शोकाची लाट उसळली आहे.      डॉ. शिरीष वळसंगकर हे केवळ एक कुशल डॉक्टर नव्हते, तर रुग्णांशी आत्मीयतेने वागणारे, संवेदनशील आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूरच्या ...

घनसावंगी तालुक्यात २२ एप्रिल रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

Image
  सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम ३ (अ), (ब) व (४) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकारी यांनी घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण निश्चित केले आहे.    या आरक्षण प्रक्रियेनुसार सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यामुळे सामाजिक समावेशकतेस चालना मिळणार असून सर्व घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाचा न्याय मिळणार आहे.      या अनुषंगाने २२ एप्रिल २०२५ रोजी मंगळवारच्या दिवशी सकाळी ११ वाजता घनसावंगी तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार, घनसावंगी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.      या प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, राजकीय नेते, इच्छुक उमेदवार व नागरिक उप...

मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षण भूमी-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Image
छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संवाद व महाराणा प्रताप पुतळ्याचे अनावरण  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      मराठवाडा — 'आत्मनिर्भर भारत' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या दिशेने भक्कम पावले टाकत, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज १८ एप्रिल रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण औद्योगिक संवाद सत्र पार पडले. या चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाली.     कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, जे राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडले. हा सोहळा केवळ ऐतिहासिक स्मरणरंजन नव्हता, तर त्यातून मातृभूमीप्रेम, राष्ट्रभक्ती आणि आत्मनिर्भरतेचा संदेशही देण्यात आला. डिफेन्स क्लस्टरसाठी छत्रपती संभाजीनगरची तयारी     संरक्षण सामग्री उत्पादनात भारत आता आयातदार नसून निर्यातदार देशांच्या यादीत उभा राहिला आहे, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्ग...

राज्यातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड लवकरच अनिवार्य- शिक्षणमंत्री दादा भुसे

Image
  शासनाकडून निधीची हमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    राज्य सरकारने शालेय शिक्षण क्षेत्रात एक नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेसकोड (गणवेश) अनिवार्य करण्यात येणार आहे. ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज १८ एप्रिल रोजी माळेगांव येथे दिली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली.     दादा भुसे म्हणाले, “शिक्षक हे समाजातील आदर्श व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व असतात. त्यांच्या कामकाजात व्यावसायिकता, एकरूपता आणि शिस्त टिकवण्यासाठी ड्रेसकोड गरजेचा आहे. शिक्षकांची एकसंध ओळख निर्माण व्हावी, त्यांच्या भूमिकेचा आदर वाढावा आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही शिस्तीची भावना निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.” ड्रेसकोडसाठी शासनाकडून निधीची तरतूद    राज्य सरकार या योजनेसाठी आवश्यक तो निधी पुरविणार असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले. “शिक्षकांवर कोणताही आर्थिक बोजा न येता शासनाकडून गणवेशासाठी आवश्यक निधी...

भीषण अपघातात मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

Image
ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल दैठणा- माळसोन्ना रस्त्यावर भीषण अपघात; गावात शोककळा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एका भीषण झालेल्या अपघातात मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील दैठणा- माळसोन्ना रोडवर गुरुवारी (दि. १७) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोरवड येथील प्रल्हाद उद्धवराव गिराम (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यात त्यांची बहीण कल्पना पांडुरंग धोंडगे व दोन भाचे गंभीर जखमी झाले होते. त्यातील माऊली पांडुरंग धोंडगे (वय ६) या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.      प्रल्हाद गिराम हे आपल्या बहिणीसह भाच्यांना एस.टी. बसमध्ये बसवण्यासाठी दुचाकीवरून पोखर्णीकडे जात होते. त्यावेळी माळसोन्नाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्पर (क्र. एमएच ४० सीडी ४५९८) ने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला ...

दोन सख्या बहिणी झाल्या एकाच वेळी एमबीबीएस: आई वडिलांचे स्वप्न केले साकार

Image
प्रेरणादायी;  ग्रामीण भागातील डॉ. नेहा व डॉ. दिव्या चव्हाण यांची यशोगाथा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        एका लहानशा गावातून उगम पावलेल्या डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या चव्हाण या सख्या बहिणींनी एकाच वेळी एमबीबीएस पदवी मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. एकीने अंबाजोगाई येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून, तर दुसरीने जळगाव येथून ही शैक्षणिक कामगिरी पार पाडली आहे.परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावातील या बहिणी आहेत.     त्यांच्या या यशामागे आहेत त्यांचे वडील सखाराम चव्हाण, जे सध्या येसेगाव (ता. जिंतूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलींमध्ये शिक्षणाची गोडी लावली आणि त्या दोघींना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिंतूरच्या संचारेश्वर विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण जवाहर विद्यालयात पूर्ण केले. आजोबांचे शब्द कायम आठवणीत      शालेय जीवनातच त्यांचे आजोबा सतत सांगायचे, "मुलींनो, डॉक्टर व्हा आणि समाजसेवा करा." या प्रेरणादा...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या