घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम ३ (अ), (ब) व (४) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकारी यांनी घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण निश्चित केले आहे.
या आरक्षण प्रक्रियेनुसार सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यामुळे सामाजिक समावेशकतेस चालना मिळणार असून सर्व घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाचा न्याय मिळणार आहे.
या अनुषंगाने २२ एप्रिल २०२५ रोजी मंगळवारच्या दिवशी सकाळी ११ वाजता घनसावंगी तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार, घनसावंगी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, राजकीय नेते, इच्छुक उमेदवार व नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. ही आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने होणार असून, संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिकरीत्या आयोजित केली जाणार आहे.
ही सोडत प्रक्रिया आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, यातून निश्चित होणारे आरक्षण हे पुढील पाच वर्षांसाठी लागू राहील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी या सोडतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुकता असून, आरक्षणाच्या अनुषंगाने अनेक इच्छुकांचे राजकीय गणित ठरणार आहे. यामुळे २२ एप्रिलची ही सोडत तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Comments
Post a Comment